कलाकारांचे एकपात्री सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:32+5:302021-06-30T04:08:32+5:30
पुणे : कोरोनात पतीची आणि परिवाराची काळजी घेणारी पत्नी, वऱ्हाड निघालंय लंडनला मधील रंजक पात्रं, ती फुलराणी, होम मिनिस्टर ...
पुणे : कोरोनात पतीची आणि परिवाराची काळजी घेणारी पत्नी, वऱ्हाड निघालंय लंडनला मधील रंजक पात्रं, ती फुलराणी, होम मिनिस्टर मधले आदेश भाऊजी, घरी आल्यानंतर होणारी गंमत, सर्वधर्म समभाव या व अशा विविध विषयांवर कलाकारांचे एकपात्री सादरीकरण पार पडले.
सहारा प्रॉडक्शन हाऊस आणि मिडास टच इन्स्टिट्यूट यांच्या वतीने एकपात्री सादरीकरण पार पडले. मार्च महिन्यात १३ ते ६५ या वयोगटामधे ऑनलाईन पद्धतीने ऑडिशन्स घेतल्या होत्या. सहारा प्राॅडक्शन हाऊस तर्फे निरनिराळ्या समाज प्रबोधन करणाऱ्या लघुपटांची निर्मिती केली जाणार असून, या स्पर्धकांना यातून अभिनयाची संधी दिली जाणार असल्याचे सहारा चे संस्थापक डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
स्पर्धेचे परीक्षण चित्रपट नाट्य आणि मालिकांचे लेखक आणि दिग्दर्शक प्रदीप प्रभुणे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस अधीक्षक डॉ. विठ्ठल जाधव तसेच सहाराच्या रसिका भवाळकर, मिडास टच च्या डॉ. अंजली जोशी, वैशाली चिपलकट्टी, अभिजित जोशी मेमोरियल फाऊन्डेशन चे नीतू अरोरा आणि अथर्व जोशी उपस्थित होते.