समाधानाची बरसात! १११ टक्के पाऊस, बळीराजा सुखावला, १९ धरणे भरली, रब्बी हंगामाला होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:41 AM2017-09-15T02:41:12+5:302017-09-15T02:41:21+5:30
पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत चालू हंगामात १११ टक्के पाऊस झाला आहे; तसेच जिल्ह्यातील २५ पैैकी १९ धरणे भरल्याने पुणे शहरातील नागरिकांबरोबर जिल्ह्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत हंगामात सर्वाधिक पावसाची टक्केवारी ही जुन्नर तालुक्यातील १४४.५ मिमी आहे. त्या खालोखाल खेड १४१.३ मिमी, भोर १३३.६ मिमी, मावळ १३३.६ मिमी, मुळशी १२४.९ मिमी, आंबेगाव १०७.४ मिमी, दौंड १०७.२ मिमी, शिरूर ९७ मिमी, इंदापूर ९४.७ मिमी, बारामती ९३.२ मिमी, हवेली ७३.७ मिमी, वेल्हा ६३.३ मिमी, तर सर्वात कमी पुरंदर तालुक्यात ५६.७ मिमी पावसाची टक्केवारी आहे. तर तेरा तालुक्यांत एकूण १४५४.२ मिमी पावसाची झाल्याने नोंद आहे. तर १११.९ टक्के सरासरी या हंगामाची आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही मावळ तालुक्यात २३१.३ मिमी झाली आहे. त्याखालोखाल जुन्नर १६०.१ मिमी, खेड १५९.४ मिमी, भोर १४४ मिमी, मुळशी १३०.५ मिमी, दौंड १२९.० मिमी, आंबेगाव ११६.७ मिमी, शिरूर ११३.४ मिमी, इंदापूर ११२.३ मिमी, बारामती १११.३ मिमी, हवेली ८४.९ मिमी, पुरंदर ६९.२ मिमी, वेल्हा ६६.३ मिमी असा तेरा तालुक्यात एकूण १६२९.२ मिमी पावसाची झाल्याने नोंद आहे. तर १२५.३ टक्के सरासरी या हंगामाची आहे.
विशेषत: पुरंदर आणि बारामती या दोन तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. सध्या या तीन तालुक्यात अद्यापही ४५ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र गुरवारी झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत होत्या. मात्र गुरूवारी (दि. १४) या तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या २४ तासांत बारामती येथे सर्वाधिक ५०.५ मीमी, तर दौंडमध्ये ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर खेड ३९.३ मिमी, आंबेगाव २८०८ मिमी, तर जुन्नर तालुक्यात २५.६ मिमी पाऊस झाला आहे.
यंदा ‘बक्कळ’ पाऊस असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शेतातून चांगले पीक मिळेल या आशेने शेतकºयांनी रोप लावली. मात्र जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. आॅग्सट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मागील आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. दुष्काळी पट्टयात मुसळधार पाऊस झाला. बारामती, दौंड, भोर, वेल्हा, शिरूर, इंदापूर या भागात समाधानाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात बारामती येथे सर्वाधिक ५०.५ मिमी पावसाची नोंद झाली. तर दौंड येथे ४८ मिमी, खेड ३९.३ मिमी, शिरूर ३८.६, आंबेगाव २८.८ मिमी, जुन्नर २५.६ मिमी, इंदापूर १९.५ मिमी, हवेली १२.५ मिमी, पुरंदर येथे ७.४ मिमी, वेल्हा २.५ मिमी, मावळ येथे ४.३ मिमी, भोर १.८ मिमी पावसाची नोंद झाली. तर मुळशी तालुक्यात पाऊस पडलाच नाही.
दुष्काळी पट्ट्यात मुसळधार पाऊस
पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड या तीन तालुक्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र मागील आठवडाभरापासून या दुष्काली पट्टयात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोठा प्रश्न मिटला आहे.गुरूवारी बारामती तालुक्यात ५०.५ मिमी, दौंड तालुक्यात ४८ मिमी, इंदापूर तालुक्यात १९.५ मिमी, तर पुरंदर तालुक्यामध्ये ७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहिती
धरण प्रकल्पसाठा टक्केवारी
पानशेत १०.६५ १००
डिंभे १२.४९ १००
पवना ८.५१ १००
कळमोडी - १००
चासकमान - १००
आंध्रा - १००
कासारसाई - १००
मुळशी - १००
नीरा देवघर ११.७३ १००
भामा आसखेड ७.६७ १००
वडीवळे - १००
भाटघर २३.५० १००
धरण प्रकल्पसाठा टक्केवारी
घोड - १००
वडज - १००
वरसगाव १२.८२ १००
खडकवासला १.९७ ९७.३
वीर ९.४१ १०००
माणिकडोह - ७५.६६
पिंपळगाव जोगे - ८३.५१
गुंजवणी २.१६ ५९.८१
उजनी ५३.५७ १०९.३४
टेमघर ३.७१ ५५.३३
येडगाव - ९८.४७
विसापूर - ५६.१५