व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवणार
By admin | Published: February 16, 2017 03:23 AM2017-02-16T03:23:57+5:302017-02-16T03:23:57+5:30
प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे व राजश्री शिळीमकर
बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे व राजश्री शिळीमकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रभागातून भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने नागरिक या प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
विविध सोसायट्या, मंडळे यांना भेटी देत या चारही उमेदवारांनी प्रचार केला. उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुस्लिम समाजातील अनेक संघटनांनीदेखील या वेळी उमेदवारांना समर्थन दिले.
उमेदवारांनी सांगितले, की भाजपा सरकारने एलबीटी बंद करून अनेक अडचणी दूर केल्या आहेत. व्यापार वाढविण्यासाठी व व्यापाऱ्यांना भराव्या लागणाऱ्या अनेक करांपासून भाजपा सरकार आपली मुक्ती करेल. व्यापाऱ्यांच्या प्रत्येक हाकेला भाजपा सरकार साथ देईल. ‘सबका साथ - सबका विकास’ ही भूमिका घेऊन भाजपा सरकार काम करीत आहे. केंद्रात व राज्यात वाहत असलेली विकासकामाची गंगा आपल्या प्रभागात आणण्यासाठी चारही उमेदवार कटिबद्ध आहेत. या वेळी नगरसेविका मनीषा चोरबेले, वंदना भिमाले, डॉ. भरत वैरागे, अविनाश शिळीमकर, राजेंद्र सरदेशपांडे, हेमंत देशपांडे, गणेश शेरला, सुशील लोंढे, शरद पायगुडे, अमित शहा, राहुल मेहता, किरणराम सिन्हा, दीपक देशपांडे, अतिष काथवटे, श्याम आवळे, मनोज भापकर, मनीष शिंदे, निखिल शिळीमकर, चेतन चावेर, लक्ष्मण कनोजे, संजय शिळीमकर, अरुण काळे, संदीप पारखे, राहुल गुंड, मयूर कोठारी, आदेश चोरबेले, मुंकुद वर्मा आदी उपस्थित होते. (वार्ताहर)