कचरा समस्या सोडवा अन्यथा आयुक्तालयात टाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:32+5:302021-03-28T04:10:32+5:30
प्रभाग क्र. ३१ मधील सर्व कचरा पेटी आणि कंटेनर काढून टाकले आहेत. त्यामुळे रस्त्याच्याकडेला कचरा साठत आहे. नागरिक देखील ...
प्रभाग क्र. ३१ मधील सर्व कचरा पेटी आणि कंटेनर काढून टाकले आहेत. त्यामुळे रस्त्याच्याकडेला कचरा साठत आहे. नागरिक देखील कुठेही कचरा टाकत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रभागात भाजी आणि फळ विक्रेते, हॉटेल मालक या ठिकाणी कचरा टाकत आहे आणि त्यामुळे या कचरा टाकण्याच्या ठिकाणी सतत भटकी जनावरांचा वास आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे, या सर्व कारणांमुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
तपोधाम मध्ये कचरा विलगी कारणासाठी रोज गाडी येते परंतु तपोधाम रस्ता मुळातच अरुंद असल्याने वाहतुकीला अडथळा येतोय आणि पर्यायी अपघात ही होत आहेत.
या कचरा प्रश्नासाठी मनसेचे पुणे शहर संघटक शैलेश अशोक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज क्षेत्रीय अधिकारी संतोष वारुळे यांना निवेदन देण्यात आले की, पुढील दहा दिवसांत तपोधाम मधील कचऱ्याच्या समस्येचा मार्ग शोधावा आणि नागरिकांची यातून कायमची सुटका करावी, त्याचप्रमाणे या कचरा प्रश्नाला मार्ग न निघाल्यास मनसे आपल्या पद्धतीने आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे चे उपविभाग अध्यक्ष सचिन विप्र, शाखाद्यक्ष हितेश कुंभार, आनंद पाटील, भाऊसाहेब पाटील, अशोक कदम तसेच संतोष वाघमारे आणि किरण जोशी उपस्थित होते.