उंड्री गावचा पाणीप्रश्न त्वरित मार्गी लावा : कामठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:53+5:302021-03-04T04:20:53+5:30
पुणे : उंड्री गावातल्या पाणीप्रश्नासंदर्भात स्वारगेट पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता पुंडे व उपअभियंता सोरटे यांना पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता ...
पुणे : उंड्री गावातल्या पाणीप्रश्नासंदर्भात स्वारगेट पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता पुंडे व उपअभियंता सोरटे यांना पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी निवेदन देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
कामठे यांनी आपल्या निवेदनात उंड्री गावचा पुणे महानगरपालिकेत मागील दीड ते दोन वर्षांपासून समावेश झाला आहे. परंतु गाव समावेश झाल्यापासून सदर भागाला पिण्याच्या पाण्याची खूपच टंचाई भासत आहे. सोसायट्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, सदरचा टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा अतिशय अल्प आहे .त्यामुळे सदर भागातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात यावी. पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांत सुरळीत झाला नाही तर भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्ष डॉ. तेजस्विनी अरविंद, उंड्री गावाच्या माजी सरपंच शारदाताई होले उपस्थित होत्या .