वटवृक्षाच्या खोडाचा गुंता सोडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:42+5:302021-06-26T04:08:42+5:30

पुणे : दरवर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला महिला दोरा गुंडाळून हा सण साजरा करतात. पण नंतर तो दोरा तसाच वडाला ...

Solved the trunk of the banyan tree | वटवृक्षाच्या खोडाचा गुंता सोडवला

वटवृक्षाच्या खोडाचा गुंता सोडवला

Next

पुणे : दरवर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला महिला दोरा गुंडाळून हा सण साजरा करतात. पण नंतर तो दोरा तसाच वडाला कित्येक दिवस राहतो. दोन तरुणींनी हा दोरा काढण्याचा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत दहा-बारा वृक्षांचा दोरा काढून तो सर्व दोरा त्यांनी महापालिकेच्या कचरावेचकांकडे सुपूर्द केला.

पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा पूजेचा एक हेतू समजला जातो. पण वडाभोवती दोरा गुंडाळण्याचे ठोस कारण मात्र अद्याप फारसे कोणाला माहिती नाही. पण या प्रथेमुळे दरवर्षी अनेक वटवृक्षांच्या खोडाला दोरा बांधला जाते. श्वेता शारदा नथू साठे आणि कल्याणी संध्या या दोघींनी हा दोरा काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

श्वेता ही काही वर्षांपासून ‘अंघोळीची गोळी’ या मोहिमे अंतर्गत काम करत आहे. झाडांना खिळे ठोकले, दोरे गुंडाळले, तारा गुंडाळल्या की, त्यांचे विघटन झाडामध्ये होत असते. तारा, खिळे ह्यांना गंज लागतो, तो गंज पर्यायाने झाडाला लागतो. खोडाला गुंडाळलेले दोरे पावसाळ्यात झाडाला आवळून बसतात. त्यामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊ लागतो. म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे कल्याणी हिने सांगितले. एका झाडाचा दोरा काढायला दहा मिनिटे लागतात. तो सर्व एकत्र करून पालिकेच्या कचरावेचकांना देण्यात येतो. मोठ्या वडाच्या झाडाला एका वेळी पाच ते आठ किलो इतक्या वजनाचा दोरा निघतो.

चौकट

“सकाळी ६ वाजल्यापासून आम्ही चांदणी चौकापासून ते शास्त्रीनगर रोडवरील संगम चौक येथपर्यंतच्या सर्व वडाच्या झाडांचे दोरे काढले. अनेक लोकांनी ‘आम्ही हे का करतोय’ म्हणून प्रश्न विचारले. काहींनी कौतुक केले.”

- कल्याणी संध्या

चौकट

“झाडांचा जीव गुदमरतो म्हणून आम्ही त्यांना मोकळं करतोय. सकाळी उठून हे काम करायला जायला अनेकांना नक्कीच कंटाळा येईल, पण दोऱ्याच्या कचाट्यातून झाडाला मुक्त केल्याचे एक मोठे समाधान नक्की मिळेल.”

- श्वेता शारदा नथू साठे

Web Title: Solved the trunk of the banyan tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.