कस्टमचे पार्सल सोडवतो... महिलेला १३ लाखांचा गंडा

By रोशन मोरे | Published: November 19, 2023 04:25 PM2023-11-19T16:25:16+5:302023-11-19T16:25:32+5:30

नोकरी आणि कस्टममधील पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून १३ लाख २७ हजार वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतले

Solves the customs parcel... Rs. 13 lakhs to the woman | कस्टमचे पार्सल सोडवतो... महिलेला १३ लाखांचा गंडा

कस्टमचे पार्सल सोडवतो... महिलेला १३ लाखांचा गंडा

पिंपरी : ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १३ लाख २७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना २१ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत चिंचवड येथे घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची प्राथमिक माहिती गोळा करून त्यांना संशयिताने फोन करीत नोकरीचे आमिष दाखविले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला त्यांचे एक पार्सल कस्टममध्ये अडकल्याचेही सांगितले. नोकरी आणि कस्टममधील पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून १३ लाख २७ हजार वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतले. महिलेला फोन करणाऱ्या व्यक्तीने तो कार्निवल ब्रिझ शिपिंग कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

Web Title: Solves the customs parcel... Rs. 13 lakhs to the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.