वळणवाडी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:37+5:302021-06-23T04:08:37+5:30
नंबरवाडी प्रभाग ६ मधून वळणवाडी प्रभाग ५ मध्ये जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. या ...
नंबरवाडी प्रभाग ६ मधून वळणवाडी प्रभाग ५ मध्ये जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. या कामाचे पाणीपूजन ज्येष्ठ नागरिक जयराम अडसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच मायाताई डोंगरे, विद्यमान सदस्य जंगल कोल्हे, किरण आल्हाट, ज्योती संते, स्नेहल कांकरिया, राजश्री काळे, उद्योजक संजय वारुळे, जालिंदर कोल्हे,माजी सदस्य ईश्वर अडसरे, अतुल कांकरिया, विकास फुलसुंदर, संदीप अडसरे, जयराम अडसरे, अनिल भुजबळ, सत्यवान अडसरे, जयसिंग अडसरे, संजय आरोटे, उदय थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
वळणवाडी याठिकाणी ग्रामपंचायतीने बोअरवेल घेतला होता. मात्र, या बोअरवेलच्या पाण्याचा कधी तुटवडा होत, तर पावसाळ्यात गढूळ पाणी येत होते. त्यामुळे या ठिकाणी विहिरीचे पाणी आणण्याचे नियोजन होते. नंबरवाडी या ठिकाणी आशाताई बुचके यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत निधी टाकून विहीर बांधली आहे. विहिरीपासून वळणवाडी जवळच अंतरावर आहे. मात्र शेतात पीक असल्याने जलवाहिनी करण्यास अडचण होती. येथील शेतकरी व उद्योजक अभय कोठारी, तुषार देवकर, संभाजी थोरात यांच्या सहकार्यामुळे वळणवाडी या ठिकाणी जलवाहिनी नेणे शक्य झाले.
नागरिकांना पिण्याचे पाणी, लाईट व रस्ते प्रथमत: उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे व या कामासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकार्य करतात, असे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी या वेळी सांगितले.
वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वळणवाडी येथील जलवाहिनीचे पूजन करताना ज्येष्ठ नागरिक जयराम अडसरे.