दौंड तालुका पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मध्ये कही खुशी कही गम.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:19+5:302021-01-19T04:13:19+5:30
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने दत्तोबा तांबे १९२ मतांंन, नांनगावचे माजी सरपंच विश्वास भोसले ७८ मतांनी, भीमा पाटसचे माजी ...
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने दत्तोबा तांबे १९२ मतांंन, नांनगावचे माजी सरपंच विश्वास भोसले ७८ मतांनी, भीमा पाटसचे माजी संचालक जगन्नाथ नागवडे ३२७ मतांनी, खरेदी-विक्री संघाचे संचालक मच्छिंद्र काळभोर २० मतांनी पराभूत झाले. भाजपचे भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर ७० मतांनी, गणेश सुरेश शेळके (२८९ मतांनी वरवंडचे माजी सरपंच गोरख दिवेकर ३११ मतांनी, जयदीप सोडनवर १३७ मतांनी, माजी उपसभापती शिवाजी दिवेकर ८७ मतांनी पराभूत झाले.
प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विकास खळदकर (३० मतांनी ), महिला अध्यक्षा योगिनी दिवेकर (४०० मतांनी), जयश्री खेडेकर (१० मतांनी) मीनाक्षी रामदास दिवेकर (१५ मतांनी), संतोष मधुकर दोरगे (१४० मतांनी) बाजार समितीचे संचालक रामचंद्र चौधरी (५६ मतांनी), वाळकीचे माजी सरपंच बाळासाहेब थोरात (९७ मतांनी), संदीप पाटील खळदकर (७८ मतांनी), भाजपाचे अशोक फरगडे (३११ मतांनी), सुखदेव चोरमले (२६८ मतांनी), कैलास खेडेकर (४ मतांनी), दिपाली किरण काळे (२०० मतांनी), मनीषा मुकेश गुणवरे (१६० मतांनी) वासुदेव काळे यांच्या स्नुषा प्रियंका केशव काळे ( १६७मतांनी), सोमनाथ गडदे (४ मतांनी)
विजयी झाले आहेत.