संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकल्याने कही खुशी, कही गम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:10+5:302021-04-10T04:11:10+5:30
- मनिषा सानप, परीक्षार्थी -- राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता घेतलेला निर्णय योग्य आहे. तरीही विद्यार्थ्यांची सहनशीलता पहाता वेळापत्रक जाहीर ...
- मनिषा सानप, परीक्षार्थी
--
राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता घेतलेला निर्णय योग्य आहे. तरीही विद्यार्थ्यांची सहनशीलता पहाता वेळापत्रक जाहीर करून नियमांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा घ्यावी.
- दिगांबर मांडवगणे
---
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्याचे स्वागतच आहे. मुलांच्या आरोग्यास अग्रक्रम हवाच. मात्र आधीच लांबलेली परीक्षा कोरोना स्थिती निवळताच लगेच घेण्यात यावी. तसेच पुढील परीक्षेसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात यावी.
- रंजन कोळंबे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना
---
सरकारने विध्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा विचार केला नाही. कोरोनावर सुद्धा नियंत्रण मिळवता येईना. विद्यार्थ्यांनी किती वेळा अभ्यासाचं, आणि खर्चाचा नियोजन करायचं? परीक्षा अगदी तोंडावर असताना त्या वारंवार रद्द करणे अतिशय निंदनीय आहे.
- ज्ञानेश्वर विळेकर, परीक्षार्थी
--
आरोग्य यंत्रणेवर आधीच प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षा पुढे जाणे महत्वाचे होते. या निर्णयाचे स्वागत आहे.
- ऐश्वर्या भद्रे, परीक्षार्थी
---
परीक्षेबाबत दोन विरुद्ध भूमिका मांडल्या जात होत्या व दोन्ही भूमिका समर्पक होत्या. परिस्थिती सामान्य होताच प्राधान्याने या परीक्षा घेतल्या जाव्यात. तसेच आशा प्रकारचे निर्णय परीक्षा तोंडावर आल्यावर घेतले जाऊ नयेत.
निलेश निंबाळकर, परीक्षार्थी