काही लोक पाप लपवायला लंडनला जातात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 15:13 IST2025-03-02T15:11:52+5:302025-03-02T15:13:01+5:30

- तुमची पापे धुण्यासाठी कुंभमेळ्याच्या गंगेत गेलो होतो, अशी टीका करीत ६५ कोटी लोक कुंभमेळ्यात गेले आहेत

Some people go to London to hide their sins Eknath Shinde hits out at Uddhav Thackeray | काही लोक पाप लपवायला लंडनला जातात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

काही लोक पाप लपवायला लंडनला जातात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

नारायणगाव : गंगेत पाप धुवायला गेले अशी टीका आपल्यावर टीका करणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप केलं , हिंदुत्वाचा विचार विकण्याचं काम केले, पवित्र धनुष्यबाण घाण टाकण्याचे पाप तुम्ही केलं, तुमची पापे धुण्यासाठी कुंभमेळ्याच्या गंगेत गेलो होतो, अशी टीका करीत ६५ कोटी लोक कुंभमेळ्यात गेले आहेत, त्या कुंभमेळ्याचाही हा अपमान आहे, टोला लगावून काही लोक पाप लपवायला लंडनला जातात, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

नारायणगाव येथे जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेना पक्षप्रवेश व महासभानिमित्त आयोजित सभेत एकनाथ शिंदे हे बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय शिवतारे उपस्थित होते. या महासभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आ. शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, संध्या भगत, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, नित्यानंद येवले, सचिन वाळूंज, ॲड. राजेंद्र कोल्हे, ॲड. सचिन चव्हाण, संतोष वाजगे, आरिफ आतार, अजित वाजगे, गणेश पाटे, हेमंत कोल्हे, संगीता वाघ, परशुराम आल्हाट, सादिक आतार, नीलेश मुटके यांच्यासह जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार सोनवणे यांच्या मागणीनुसार जुन्नरच्या विकासकामांचा बॅकलॉग या पुढील काळात भरून काढला जाईल. नारायणगाव येथील बस स्थानकात वाहनतळ सुविधा, येडगाव जलाशयात नौकानयन सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवून गोद्रे येथील होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची जबाबदारी आपली आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात औद्योगिक वसाहती सुरू करा, त्यास परवानगी देण्यात येईल.

आमदार शरद सोनवणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन आहेत. विकास काम देऊन शिवनेरीचा मान वाढवण्याचे काम करतील. जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

विरोधकांनी सोनवणेंना हलक्यात घेतले

विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी सरकार तयार करण्याची तयारी केली होती. मात्र, माझ्या लाडक्या बहिणींनी विरोधकांना भुईसपाट केले. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, लाडकी बहिणींनी महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. विरोध पक्ष नेता होईल इतके आमदारही दिले नाहीत. विरोधकांनी शरद सोनवणे यांना हलक्यात घेतले, मात्र सोनवणे यांनी एकीच मारा पर स्वालीड मारा, मी डॉक्टर नाही परंतु मी मोठमोठे ऑपरेशन करतो. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असे विरोधक बोलत होते. परंतु विरोधकांचा ‘टांगा पलटी घोडे फरार’ अशी अवस्था केली आहे. 

Web Title: Some people go to London to hide their sins Eknath Shinde hits out at Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.