चिंचवड-खडकी दरम्यान सिग्नलिंगच्या कामांमुळे काही गाड्या प्रभावित
By नितीश गोवंडे | Published: August 18, 2023 07:38 PM2023-08-18T19:38:17+5:302023-08-18T19:40:32+5:30
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा - पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड - खडकी स्थानका दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन ...
पुणे : मध्य रेल्वेच्यापुणे विभागातील लोणावळा - पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड - खडकी स्थानका दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन अ`टोम`टिक सिग्नलिंग च्या बाबतीत महत्वाची कामे केली जाणार आहेत. यामुळे रविवार (२० ऑगस्ट) रोजी रेल्वे नं. १२१२७/१२१२८ पुणे – मुंबई – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, ११००७/११००८ पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस, १२१२५/१२१२६ पुणे –मुंबई – पुणे प्रगति एक्स्प्रेस, ११०२९/११०३० मुंबई – कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
तसेच रविवार (२० ऑगस्ट) रोजी पुणे येथून तळेगाव साठी ०६:४८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८४, ०५:५३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८६ तसेच पुणे येथून लोणावळा साठी ०६:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५८, ०९:५७ वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५६२, ११:१७ वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५६४, १५:०० वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५६६, १६:२५ वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५६८ रद्द राहणार आहे. शिवाजीनगरहून तळेगाव साठी १५:४७ वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५८८, १७:२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० तसेच शिवाजीनगरहून लोणावळा साठी ०८:१० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६० रद्द राहणार आहे. तसेच लोणावळा वरून ०६:३० वाजता शिवाजीनगरसाठी सुटणारी लोकल क्रमांक ०१५५३, १०:०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९, १५:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६३, तळेगाववरून ०७:४८ वाजता पुणे साठी सुटणारी लोकल क्रमांक ०१५८५, ०९:५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८७, १६:४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९, लोणावळा वरून ०७:२५ वाजता पुणे साठी सुटणारी लोकल क्रमांक ०१५५५, ०८:२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५७, १४:५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द राहील.
रविवार (२० ऑगस्ट) रोजी रेल्वे क्रमांक १२९३९ पुणे – जयपुर एक्स्प्रेस पुणे वरून नियमित प्रस्थान वेळ १७:३० ऐवजी १७:४५ वाजता सुटेल तसेच रेल्वे क्रमांक २२९४३ दौंड – इंदौर एक्स्प्रेस दौंड वरून नियमित प्रस्थान वेळ १४:०० वाजता ऐवजी १८:०० वाजता सुटेल. रेल्वे क्रमांक २२१५९ मुंबई – चेन्नई, १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट, ११०१९ मुंबई – भुवनेश्वर , २२७३२ मुंबई – हैदराबाद आणि १९ ऑगस्ट रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १६३३२ त्रिवेंद्रम – मुंबई, ११३०२ बेंगळुरु – मुंबई, २२१९४ ग्वालियर – दौंड एक्स्प्रेस या गाड्या वरील कामामुळे पुणे विभागात काही विलंबाने चालतील, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली