Indian Railway | पुणे-लोणावळादरम्यान कामांमुळे काही रेल्वे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:57 AM2022-12-22T10:57:50+5:302022-12-22T10:59:33+5:30
माहिती करून नवीन वेळापत्रक...
पुणे :पुणेरेल्वे विभागातील पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील मळवली-कामशेत या रेल्वे स्टेशनदरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीदरम्यान आरसीसी बॉक्स टाकायचे असल्याने काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे शॉर्ट टर्मिनेट, उशिरा धावरणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.
२२ आणि २३ डिसेंबरला रवाना होणारी रेल्वे नं. ११०२५/११०२६ पुणे-भुसावळ रेल्वे, २३ डिसेंबरला रवाना होणारी रेल्वे नं. ११०२९/११०३० मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द केली आहे. यासह पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या सकाळी ११:१७, दुपारी ०३:०० आणि ०४:२५ वाजेच्या लोकलसह, पुण्याहून तळेगाव जाणारी दुपारची ०३:४२ ची लोकल, लोणावळ्याहून पुण्याला येणारी ०२:५०, ०३:३० आणि संध्याकाळी ०५:३० च्या लोकलसह तळेगावहून पुण्याला येणारी दुपारची ०४:४० ची लोकलदेखील रद्द करण्यात आली आहे.
२४ डिसेंबर रोजी रवाना होणारी भुसावळ-पुणे रेल्वे नं. ११०२५ देखील रद्द राहणार आहे. यासह २३ डिसेंबरला निघणारी रेल्वे नं. १२२६३ पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस सकाळी ११:१० ऐवजी दुपारी ०४:४५ वाजता रवाना होईल, तर रेल्वे नं. २२९४३ दौंड-इंदौर एक्स्प्रेस दौंडहून दुपारी २ ऐवजी ३ वाजता सुटेल. तसेच रेल्वे नं. १२१६४ चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसदेखील काही वेळ उशिराने धावेल.