Indian Railway: दौंड-मनमाड स्थानक दरम्यानच्या कामांमुळे काही रेल्वे रद्द
By नितीश गोवंडे | Published: October 3, 2022 09:08 PM2022-10-03T21:08:37+5:302022-10-03T21:10:01+5:30
७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान विविध रेल्वे रद्द केल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली...
पुणे :दौंड-मनमाड काष्टी आणि बेलवंडी दरम्यान रेल्वेच्या सुरू असलेल्या विविध कामांमुळे मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे दि. ७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान विविध रेल्वे रद्द केल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.
रद्द केलेल्या गाड्या
- गाडी नं. २२१२४ अजनी - पुणे एसी एक्स्प्रेस ४, ११ आणि १८ ऑक्टोबर रोजी ; तर २२१२३ पुणे - अजनी एसी एक्स्प्रेस ७, १४ आणि २१ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
- गाडी नं. २२११७ पुणे - अमरावती एसी एक्स्प्रेस ५, १२ आणि १९ ऑक्टोबर रोजी ; तर २२११८ अमरावती - पुणे एक्स्प्रेस ६, १३ आणि २० ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
- गाडी नं. १२११४ नागपूर- पुणे गरीबरथ एक्स्प्रेस ४, ७, ९, ११, १४, १६ आणि १८ ऑक्टोबर रोजी ; तर गाडी नं. १२११३ पुणे - नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस ५, ८, १०, १२, १५, १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
- गाडी नं. २२१३९ पुणे - अजनी एक्स्प्रेस ८ आणि १५ ऑक्टोबर रोजी ; तर गाडी नं. २२१४० अजनी - पुणे एक्स्प्रेस ९ आणि १६ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
- गाडी नं. २२१४१ पुणे - अजनी एक्स्प्रेस ६ आणि १३ ऑक्टोबर रोजी ; तर गाडी नं. २२१४२ अजनी - पुणे एक्स्प्रेस ७ आणि १४ ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे.
- गाडी नं. ११४०९ पुणे - नजीबाबाद डेमू १६ ते १८ ऑक्टोबर आणि गाडी नं. ११४१० नजीबाबाद - पुणे १७ ते १९ ऑक्टोबर पर्यंत रद्द राहणार आहे.