Railway Time Table: पुण्यातून सुटणाऱ्या काही रेल्वे रद्द; जाणून घ्या, नवीन वेळापत्रक...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 09:32 AM2022-10-03T09:32:20+5:302022-10-03T09:32:30+5:30
वेळापत्रकानुसार पुणे विभागातून काही नवीन गाड्या सुरू
पुणे : रेल्वे बोर्डाने १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले असून, यात पुण्याहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेच्या वेळेत बदल केला आहे. काही रेल्वे कायमस्वरूपी रद्द केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार पुणे विभागातून काही नवीन गाड्या सुरू केल्या, तर काही रेल्वेच्या मार्गात बदल केले आहेत.
पुणे विभागात नव्याने सुरू झालेल्या रेल्वे
- ०१४३१ - पुणे ते फलटण पॅसेंजर
- ११४२७ - पुणे ते जसिदीह (झारखंड)
पुणे स्टेशनपर्यंत वाढवलेल्या रेल्वे
- १२७३० - पुणे ते नांदेड (पूर्वी - हडपसर ते नांदेड)
वार वाढवलेल्या रेल्वे..
- १२७२९ - पुणे ते नांदेड - दरराेज (पूर्वी आठवड्यातून एक दिवस)
वार बदललेल्या रेल्वे...
- १२१०३ - पुणे ते लखनौ दर मंगळवारी (पूर्वी - दर रविवारी)
- १७०१३ - हडपसर ते हैदराबाद दर मंगळवार, शुक्रवार, रविवार (पूर्वी सोमवार, बुधवार, शनिवार)
एक्स्प्रेस ते सुपरफास्ट बदल
- २२१८५ - अहमदाबाद-पुणे-अहमदाबाद
- २२१४१ - पुणे-नागपूर-पुणे
या रेल्वे बंद...
- ११४० - पुणे ते अमरावती
- ५१३१८- पुणे ते पनवेल पॅसेंजर
- ५१४०१ - पुणे ते मनमाड
- ९९८१६ - पुणे ते लोणावळा
- ९९८१८ - पुणे ते लोणावळा
- ९९८११ - लोणावळा ते पुणे
- ९९८१३- लोणावळा ते पुणे
टर्मिनलमध्ये बदल...
- १७०१३ - हडपसर ते हैदराबाद (पूर्वी पुणे)
- १६३८१ - कन्याकुमारी ते पुणे (पूर्वी मुंबई)