‘कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन...’
By admin | Published: December 22, 2015 11:50 PM2015-12-22T23:50:06+5:302015-12-22T23:50:06+5:30
आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात
पुणे : आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात आल्यानंतर जीवन कसे जगायचे ते शिकले अशी कृतज्ञ भावना व्यक्त करीत अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी किशोरदांच्या आठवणींचा एकेक कप्पा उलगडत संपूर्ण आसमंत ‘किशोरमयी’ केला.
’त्यांचा’ चित्रपट कारकिर्दीचा काळ हा तसा 1969 ते 1979 इतकाच .पण या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या निरागस अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर ‘मन की बात’, ’हमजोली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘बैराग’,’ आफत’, कैद’ ‘जुगनू’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले..एक उत्तम अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांची पत्नी म्हणूनच नव्हे तर ‘गीतकार’ म्हणून देखील त्या नावारूपाला आल्या. लग्नानंतर चित्रपटांमधून ‘कमबँक’ करता आले नाही, कारण चांगल्या भूमिका वाट्यालाच नाहीत अशी प्रांजळ कबुली देत आजही चांगले रोल मिळाल्यास हिंदीमध्येच नव्हे तर मराठीमध्येही काम करण्याची इच्छा असल्याचे त्या सांगतात.
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ’मन का मित’ या चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी ते सिद्धार्थ बांदोडकर यांच्याबरोबरचा विवाह, किशोर कुमार यांच्याशी झालेला दुसरा विवाह याबद्दल लीना चंदावरकर यांनी प्रथमच कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधला. किशोरकुमार यांचा चौथा आणि आपला दुसरा विवाह कसा झाला याचा जणू आँर्खो देखा हाल त्यांनी कथन केला. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते खूश व्हायचे..’कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन’ हे त्यांचे गाणे मला खूप आवडते...एरव्ही मरण्याचे नाटक करणारे किशोरदा जेव्हा १३ आॅक्टोबर १९८७ रोजी खरेच या जगातून निघून गेले. तेव्हा वाटले की हे एक दुस्वप्नच आहे. चिमटा काढला की आपण या स्वप्नातून बाहेर पडू. पण ते वास्तव होते. या प्रखर वास्तवात व किशोरदांच्या पश्चात जगण्याचे बळ त्यांनीच मला दिले, हे सांगताना त्यांचे डोळे नकळत पाणावले.
संजय लीला भंसाळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चे त्यांनी विशेष कौतुक केले. या दिग्दर्शकाने ब्लँक, गुजारिश, हम दिल चुके सनम सारखे खूप चांगले चित्रपट केले आहेत. कलात्मक आर्ट असलेल्या या चित्रपटांकडून रिटर्न मिळावे अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे,