सोमेश्वर देवस्थानाची श्रावणी यात्रा उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:17 AM2018-08-11T01:17:45+5:302018-08-11T01:17:49+5:30
श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थानाची श्रावणी यात्रा येत्या रविवार (दि. १२)पासून सुरू होत आहे.
सोमेश्वरनगर : श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थानाची श्रावणी यात्रा येत्या रविवार (दि. १२)पासून सुरू होत आहे. भाविकांच्या सुरक्षेसह विविध सुविधा पुरवण्यासाठी देवस्थान सज्ज झाल्याची माहिती देवस्थानाचे अध्यक्ष विनोद भांडवलकर यांनी दिली.
श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. राज्य शासनाने सोमेश्वर देवस्थानाला ‘ब’ दर्जा दिल्याने आणि कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने या मंदिराचा कायापालट झाला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सभामंडपाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिराला विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
यात्राकाळात भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक या ठिकाणी उपस्थित राहील. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून अग्निशामक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासात राहण्याची सोय करण्यात आली असून, यात्रेसाठी येणाºया भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती देवस्थानाचे अध्यक्ष विनोद भांडवलकर यांनी दिली.
यात्राकाळात चोख बंदोबस्तासाठी वडगाव पोलिसांनी कंबर कसली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी दर सोमवारी महाप्रसादाची सोय करण्यात येणार आहे.
सोमायाचे करंजे म्हणून राज्यात प्रसिद्ध असणाºया सोमेश्वराच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक दर वर्षी येथे गर्दी करतात. मंदिर परिसर विविध प्रकारची खेळणी, मिठाई आणि इतर दुकानांनी गजबजून गेला आहे.
>मोफत
पार्किंगची
सोय...
दर वर्षी येणाºया भाविकांकडून वाहन पार्किंगच्या बदल्यात पैसे घेतले जातात. मात्र, बाहेरगावाहून येणाºया भाविकांसाठी देवस्थानाच्या वतीने मोफत पार्किंगची सोय करण्यात आली आहे.