सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 03:33 PM2021-10-07T15:33:03+5:302021-10-07T16:37:32+5:30

तालुक्यातील अनेक गावांत कोणत्या ना कोणत्या संस्था तर स्थानिक स्वराज्य संस्था यावर कायम पद असताना एखाद्या पदावर संधी दिली नाहीतर आम्हाला डावलले हे बोलून दाखवत आहेत.

someshwar sugar factory elections ncp baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी होणार का?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी होणार का?

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची फळी गावोगावी असल्यामुळे मतांचे पारडे  जड आहे

सोमेश्वरनगर: राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहेत. मुलाखती पार पडल्यानंतर उमेदवार जाहीर होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु काही गावात पक्षविरोधी भूमिका घेत पक्षाने उमेदवारी जाहीर केलेल्या निर्णयालाच घरचा आहेर दिला असल्याची कारखाना परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे पक्षाकडून राष्ट्रवादी पक्षाची पदे तर विविध संस्थांची पदे मिळाल्यानंतरही नाराजी व्यक्त करणाऱ्यांच्या बाबत पक्ष पातळीवर कोणता निर्णय होतोय हे येणाऱ्या काळात समजू शकणार आहे. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दिलेला उमेदवार जवळपास निवडून आल्यात जमा असतो. त्याचे कारणही तसे आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची फळी गावोगावी असल्यामुळे मतांचे पारडे  जड आहे. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेस असते. 

सध्याच्या सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवार सहज निवडून येतील याची कल्पना अनेक मागणी केलेल्या उमेदवारांना असल्याने आणि विरोधसुद्धा अल्प प्रमाणात असल्याने इच्छुक आपल्याला नक्की उमेदवारी मिळेल अशी आशा लावून होते. उमेदवारी जाहीर होईपर्यंत पायाला पाय नव्हता उमेदवार यादी जाहीर होताच पावलं जाग्यावर थांबली. आजपर्यंत पक्षीय कार्यक्रमात उपस्थिती दाखविणारे अचानक निवडणूकीवेळी गायब झालेत. पण यात भ्रमनिरास झालेल्या उमेदवारांनी मनाला लावून घेतल्याने उघडपणे तर आतल्या आवाजात नाराजी बोलून दाखवत आहेत.

नाराजी व्यक्त करत आसताना नुकत्याच काल झालेल्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमादरम्यान नाराज झालेल्या काही उमेदवार हजेरी दाखविली तर काहींनी गैहजरी दाखवत नाराजी दूर झाली नसल्याचे स्पष्टपणे अनुउपस्थिती दाखवत संदेश आपोआप दिला आहे. नाराज मंडळी पक्षाच्या प्रचार दौऱ्यापासून दूर रहाणे पसंद करतात. परंतु अनेक गावात बैठका घेत विरोधात मतदान करायचे, वेगवेगळे बोर्ड कार्यकर्त्यांकडून लावून तर  मतदानावर बहिष्कार टाकायचा हे आपल्या कार्यकत्यांच्या नावावर खापर फोडून उमेदवार आपली पोळी भरून अश्या गोष्टी करवून घेत असल्याची चर्चा पुढे येत आहे. अशा माध्यमातून नाराजी दाखविणारे किती टिकून रहातात हे मतदान दिवशी आणि निकालानंतर समजणार आहे. या प्रकाराबाबत पक्ष पातळीवर बारकाईने लक्ष असल्याचे एका पदाधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकी बाबत दिवसभर शनिवारी वेळ देऊन  राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी अनेकांनी आपली मते व्यक्त करत उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. सर्वांची मते जाणून घेतल्याअंती बारामती येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी कोणी रुसू नका फुगू नका. कोणी रुसले तर कोणाला फोन करणार नाही. होणाऱ्या मतदानातून किती मत मिळावी हे समजणार आहे. हे जाहीरपणे सांगितले होते.

तालुक्यातील अनेक गावांत कोणत्या ना कोणत्या संस्था तर स्थानिक स्वराज्य संस्था यावर कायम पद असताना एखाद्या पदावर संधी दिली नाहीतर आम्हाला डावलले हे बोलून दाखवत आहेत. पक्ष श्रेष्टीकडून वैयक्तिक कामे करून घ्यायची. पक्षाची पदे भूषवायची, भरभरून मिळवायच. आणिपक्षाने उमेदवारी घेण्याचा निर्णय घेतला की पक्षाच्या विरोधात भूमिका घेणा-यांचा पक्ष पातळवीर निर्णय होणार का? पक्ष अशा कार्यकर्त्यांना शोधून पक्षाच्या पदावरून हकालपट्टी करणार का? हे पुढील काळात समजू शकेल.

Web Title: someshwar sugar factory elections ncp baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.