किरकोळ वादातून मुलाने केला आईचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:45+5:302021-03-10T04:13:45+5:30
प्रेमात होत होता अडथळा : फिर्यादी मुलगाच निघाला आरोपी लोकमत न्यूज नेटवर्क लोणी कंद : वढू खुर्द (ता. ...
प्रेमात होत होता अडथळा : फिर्यादी मुलगाच निघाला आरोपी
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी कंद : वढू खुर्द (ता. हवेली) येथे घरगुती किरकोळ वादातन मुलानेच त्याच्या प्रेयसीसोबत संगनमत करुन आईचा खून केल्याची घटना सोमवारी (दि.८) उघडकीस आली. सुशीला राम वंजारी (वय ३८, रा. मानेवस्ती वढू खुर्द (ता. हवेली) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. भर वस्तीत घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्याद देणारा मुलगा व प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. विशाल राम वंजारी (वय १९) असे खुनी मुलाचे तर नॅन्सी गॅब्रियल डोंगरे (वय २६) असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. या खुनाची फिर्याद देणारा मुलगाच खुनी निघाल्याने परिसरात खळबर पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राम वंजारी यांने प्रेयसी नॅन्सी गॅब्रियल डोंगरे हीच्याशी संगनमत करून प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सुशीला यांनी १५ हजार ५०० चोरले म्हणून भांडण केले. तसेच रागाच्या भरात विशालने सुशीला यांचा सोमवारी पहाटे धारदार शस्त्राच्या साह्याने खून केला. घटनेनंतर स्वत: पोलिस ठाण्यात जात विशालने आईच्या खुनाची फिर्याद दिली. तसेच शिवा देशमुख नाव्याच्या एक व्यक्ती खून करून फरार झाल्याचे खोटे सांगितले. पोलिसांनी वारंवार विशालकडून जबाब घेतल्याने त्यात पोलिसांना तफावत आढळली. यामुळे विशालला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच आईचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या कबुली जबाबानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शन खाली, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, मनोज तपसारे, नितीन आतकरे, केशव वाबळे, हनुमंत पडळकर, विक्रम जाधव व सहका-यांनी तपास केला तर सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे पुढील तपास करीत आहेत.
-------------