मुलगा जसा वंशाचा दिवा, मुलगीही वंशाची पणती : बोऱ्हाडे
By admin | Published: January 24, 2017 01:29 AM2017-01-24T01:29:54+5:302017-01-24T01:29:54+5:30
घरातील महिला निरोगी असेल, तरच घरातील वातावरणही निरोगी आणि चांगले राहण्यास मदत होते. मुलगा जसा वंशाचा दिवा
राजेगाव : घरातील महिला निरोगी असेल, तरच घरातील वातावरणही निरोगी आणि चांगले राहण्यास मदत होते. मुलगा जसा वंशाचा दिवा आहे असं मानले जाते, तशीच मुलगीही वंशाची पणती आहे. मुलीला जन्म द्या, स्त्रीभ्रूणहत्या करू नका, असे आवाहन रावणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ.अनुराधा बोऱ्हाडे यांनी केले आहे.
खडकी येथील शितोळेवस्ती प्राथमिक शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी रावणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अनुराधा बोऱ्हाडे यांचे ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी ‘बेटी बचाव’ या विषयावर जनजागृती केली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदयसिंग शितोळे, समीर शितोळे, किरण जांबले, दिव्या ढमे, संगीता गोंडगे, सूर्यकांत शितोळे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर भापकर, सोमनाथ पांढरे यांचे सहकार्य लाभले.