भोरमधील नंदीवाले समाजाचा मुलगा झाला पोलीस उपअधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:37+5:302021-03-18T04:10:37+5:30
या वेळी बोलताना नगराध्यक्षा निर्मला आवारे म्हणाल्या, की बाळासो घोडेकर हे श्रीपतीनगर भोर येथील रहिवासी असून, अत्यंत खडतर परिस्थितीवर ...
या वेळी बोलताना नगराध्यक्षा निर्मला आवारे म्हणाल्या, की बाळासो घोडेकर हे श्रीपतीनगर भोर येथील रहिवासी असून, अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून या उच्चपदावर पोचले आहेत. त्यांचा आदर्श समाजातील सर्वानी घ्यावा.
आई-वडील घरोघरी जाऊन भांडीविक्रीचा व्यवसाय करतात. आईवडिलांचे कष्ट आणि आशीर्वाद यांचे जोरावर मला हे यश मिळाले असल्याचे बाळासाहेब घोडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
नंदीवाले काशीकापडी समाजाच्या एकमेव तरुणाने पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातल्याबद्दल समाजबांधवांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी अश्विनी मादगुडे, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, रमेश बुदगुडे सर, संतोष मादगुडे, रवींद्र हर्णसकर, मिलिंद तोडेवाले, बुदगुडे, बाळासाहेब शेटे, विश्वामित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल पवार,किसन घोडेकर अशोक पवार,वंदना घोडेकर तसेच विश्वमित्र प्रतिष्ठानचे सहकारी व महिला उपस्थित होत्या.
१७ भोर निवड
बाळासो घोडेकर यांचा सत्कार करताना नगराध्यक्षा निर्मला आवारे व इतर.