बाभुळसर खुर्दच्या सरपंचपदी सोनाली फंड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:13 AM2021-02-27T04:13:11+5:302021-02-27T04:13:11+5:30
भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ९ पैकी ७ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर विरोधी गटास दोन जागा मिळाल्या होत्या. ...
भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ९ पैकी ७ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर विरोधी गटास दोन जागा मिळाल्या होत्या.
नवनिर्वाचित सदस्यांमधून सरपंच व उपसरपंच निवडीसाठी दि. २५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. सरपंचपद हे इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव होते. यावेळी सरपंचपदासाठी सोनाली दशरथ फंड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसरपंदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये शेखर भास्कर डाळींबकर यांना ९ पैकी ६ मते मिळाल्याने ते विजयी झाले. या वेळी नवनिर्वाचित सरपंच सोनाली फंड , उपसरपंच शेखर डाळींबकर, नवनिर्वाचित सदस्य अरुण शिदे , निता डाळींबकर, पूजा भालेराव , सुमन शिंदे , मंदाताई फंड , गणेश वाळके , लक्ष्मण डाळींबकर हे उपस्थित होते . त्यानंतर ग्रामस्थांचे वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यादरम्यान माजी सरपंच दशरथ , सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सोन्याबापू डाळींबकर , एकनाथ वाळके , अशोक वाळके , नितीन बोऱ्हाडे , अहिलाजी फंड , संभाजी फुंड, भिकाजी वाळके , सखाराम फंड , बाळु धरणे , संदिप शिदे यांसह मान्यवर उपस्थित होते .
‘कामगारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावची विकासकामे गतीने राबविण्यात येतील.’ - सोनाली फंड - नवनिर्वाचित सरपंच
सोनाली फंड शेखर डाळींबकर