जेजुरी नगराध्यक्षपदी सोनाली मोरे निश्चित

By admin | Published: December 4, 2015 02:40 AM2015-12-04T02:40:04+5:302015-12-04T02:40:04+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सोनाली मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित असून, केवळ औपचारिकताच बाकी आहे.

Sonali More decided to head Jejuri Nagar | जेजुरी नगराध्यक्षपदी सोनाली मोरे निश्चित

जेजुरी नगराध्यक्षपदी सोनाली मोरे निश्चित

Next

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सोनाली मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित असून, केवळ औपचारिकताच बाकी आहे.
जेजुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, पार्टीचे १७ पैकी १२ नगरसेवक आहेत. पहिली अडीच वर्षे अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यानंतरची अडीच वर्षे महिला राखीव असल्याने पक्ष नेतृत्वाने पालिकेतील सर्वच महिला नगरसेविकांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याने हे पद सहा सहा महिन्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यमान नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई यांची मुदत संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत समीर शिंगटे यांच्या पीठासीन अध्यक्षतेखाली सुरू असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. नगरसेविका सोनाली मोरे यांनी पक्षनेते दिलीप बारभाई, नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई, उपनगराध्यक्ष लालासाहेब जगताप, नगरसेवक सुधीर गोडसे, गणेश आगलावे, अविनाश भालेराव, नगरसेविका साधना दीडभाई, संगीता जोशी, सुरेखा सोनवणे, साधना दरेकर, रवी जोशी, दिलीप मोरे, विठ्ठल सोनवणे आदींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी तो स्वीकारला. येत्या ८ तारखेला निवडणूक होत असून, केवळ निवडणुकीची औपचारिकता व अधिकृत घोषणाच होणे बाकी आहे. (वार्ताहर)

Web Title: Sonali More decided to head Jejuri Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.