ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडितचाही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग

By नम्रता फडणीस | Published: March 6, 2024 11:50 AM2024-03-06T11:50:37+5:302024-03-06T11:50:51+5:30

संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय

Sonam Pandit the girlfriend of Sandeep Dhunia the mastermind of the drug case, is also involved in the drug racket. | ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडितचाही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग

ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडितचाही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग

पुणे : पुणे ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडित चांही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग असल्याचे समोर येत आहे.  पोलिस तपासात संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आता तिचीदेखील कसून चौकशी करण्यात येणार आहे.

 देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेट    पुणे पोलिसांनी समोर आणल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपींची आणि या संपूर्ण प्रकरणाचे पाळेमुळे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे.  तब्बल ३५००कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आले आहे. तपासातूनच ड्रग्स रॅकेटच्या मास्टर माईंडचं नाव समोर आले. यातच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला संदीप धूनिया नेपाळमार्गे कुवेतला पळाला आहे.  त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून,  त्याला नेपाळमध्ये या प्रकारचा कारखाना उभारायचा होता, असेही पोलीस तपासात समोर आले आहे. 

मात्र पोलिसांनी प्रेयसीचा शोध लावून तिचा या ड्रग्स प्रकरणात सहभाग असण्याची किंवा तिला संदीप बद्दल सर्व माहिती असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आता प्रेयसी सोनम पंडित हिची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. संदीप आणि सोनम यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर एक फ्लॅट घेतला होता, असंदेखील समोर आले आहे. संदिप पुण्यात आल्यावर सोनमकडे राहायचा अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. 

Web Title: Sonam Pandit the girlfriend of Sandeep Dhunia the mastermind of the drug case, is also involved in the drug racket.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.