‘विकासाची पहाट’ पाहण्यासाठी सोनेसांगवीकर एकवटले

By admin | Published: September 1, 2016 01:41 AM2016-09-01T01:41:09+5:302016-09-01T01:41:09+5:30

तरुणाईनं दिली हाक, लोकसहभागातून आणली विकासाची पहाट... ही परिस्थिती बदललीय सोने सांगवी गावानं... निवडणुका बिनविरोध करून खऱ्या अर्थानं तंटामुक्तीला दिशा देत

Sonsangwekar gathered to see the "dawn of development" | ‘विकासाची पहाट’ पाहण्यासाठी सोनेसांगवीकर एकवटले

‘विकासाची पहाट’ पाहण्यासाठी सोनेसांगवीकर एकवटले

Next

टाकळी हाजी : तरुणाईनं दिली हाक, लोकसहभागातून आणली विकासाची पहाट... ही परिस्थिती बदललीय सोने सांगवी गावानं... निवडणुका बिनविरोध करून खऱ्या अर्थानं तंटामुक्तीला दिशा देत गावचा विकास हाच आमचा कयास म्हणत ग्रामस्थ एकवटले आहेत.
रांजणगाव गणपतीपासून अवघ्या पाच कि. मी. अंतरावर डोंगराच्या कुशीत हे गाव आहे. अवघ्या दोन हजार लोकसंख्येच्या या गावात जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण कार्यकर्ते एकवटले. गावचा विकास करायचाच, हाच निर्धार केला.
राळेगणसिद्धी, हिवरे बाजारच्या विकासाचा आदर्श डोळ्यांसमोर होताच. प्रथम ग्रामपंचायत निवडणुकी झाल्या. महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. अलका कदम प्रथम सरपंच केल्या. त्यानंतर सुजाता संभाजी डांगे यांचीही निवड बिनविरोध केली. गावच्या सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश टाकळकर, उपाध्यक्षपदी रामदास काळे, तसेच तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा मल्हारी काळे यांची निवड करण्यात आली.
गावातील तरुणांनी पुढाकार घेतल्याने ४0 हेक्टर गायरान जमिनीवर ३३ हजार झाडांची लागवड करून जिल्ह्यात उच्चांक केला. सध्या झाडे चांगल्या प्रकारे वाढीस लागले असून, ग्रामस्थांचे लक्ष आहे. चराई बंदी, कुऱ्हाड बंदी, पाणी आडवा पाणी जिरवा, हा संकल्प हाती घेतला असून, गाव हिरवाईने नटले आहे.
शिक्षणातही गाव मागे राहू नये म्हणून आय. टी. सी. राऊंड टेबल संस्था पुणे यांनी आठ खोल्यांसाठी निधी दिला. मात्र, लोकवर्गणी हवीय, ती दहा लाख रुपये जमा करण्याचे आव्हान ग्रामस्थांपुढे होते. संस्थांनी ५० लाख रुपये दिले; मात्र गावातील ग्रामस्थांनीही लोकवर्गणीतून १० लाख रुपये जमवून गावचा शैक्षणिकदृष्ट्या विकास करण्याचा विडा उचलला आहे.
गावातील वाद गावांतच मिटवून विकासाची दिशा देणार असल्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष मल्हारी काळे यांनी सांगितले. तर, सोसायटीच्या माध्यामतून महिला बचत गट, तसेच शेतकऱ्यांना पीककर्ज देऊन हिवरे बाजारप्रमाणे येथील शेतकऱ्यांना आदर्श पीक पद्धतीचे नियोजन करण्याचा संकल्प सोसायटीचे चेअरमन सुरेश टाकळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Sonsangwekar gathered to see the "dawn of development"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.