ज्वारीची भाकरी व जनावरांना लागणारा कडबा होणार महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 AM2021-02-07T04:11:27+5:302021-02-07T04:11:27+5:30

ज्वारीचे उत्पन्न कमी झाले तर ज्वारी बरोबर कडब्याचे दर सुद्धा वाढणार आहेत. या वर्षी तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रा पेक्षा ऊस, ...

Sorghum bread and animal feed will be expensive | ज्वारीची भाकरी व जनावरांना लागणारा कडबा होणार महाग

ज्वारीची भाकरी व जनावरांना लागणारा कडबा होणार महाग

Next

ज्वारीचे उत्पन्न कमी झाले तर ज्वारी बरोबर कडब्याचे दर सुद्धा वाढणार आहेत. या वर्षी तालुक्यात ज्वारीच्या क्षेत्रा पेक्षा ऊस, गहू, हरभरा या पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे.

दरम्यान, यावर्षी मात्र कमी उत्पादनामुळे ज्वारीचे दर वाढणार असल्याने सर्व सामान्य लोकांची ज्वारीची भाकरी महाग होणार आहे. कडब्याच्या कमतरतेमुळे कडबासुद्धा भाव खाणार असल्याची शक्यता आहे. यामुळे जनावरांचा चारा महाग झाल्यावर, दुध उत्पादक शेतकरी पून्हा अडचणीत येणार आहे.

मात्र अनेक अडचणींवर मात करून, ज्या शेतकऱ्यांचे ज्वारीचे पीक चांगले आहे त्या ज्वारी उत्पादक शेतकरी वर्गाला दोन पैसे जास्त मिळावेत अशी अपेक्षा आहे. जनावरांना पोषक चारा म्हणून कडब्याला मागणी असते. कडब्याच्या पैशातून, पुढील पिक घेण्यासाठी अर्थिक चलन मिळेल अशी आशा ज्वारी उत्पादक शेतकरीवर्ग बाळगून आहे. सध्या ज्वारी ३५ ते ४० रुपये किलो असून ती पन्नासच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे.

--

चौकट

२०२ हेक्टर पर्यंत पेरणी घटली

--

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिकसा भर दिला नसल्याचे दिसत आहे. वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये

मागील वर्षी ज्वारी पिकांचे क्षेत्र सरासरी १२३९ हेक्टर पर्यंत होते. यंदा मात्र , गतवर्षीच्या तुलनेने ज्वारीचे क्षेत्र कमी १०३७ हेक्टरवर पेरा झाला असून, हा पेरा कमी झाल्याचे दिसत आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी झाले असले तरी, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने,

कांदा, हरभरा, गहू , फळबाग आदी पिकांचे क्षेत्र वाढले असल्याची माहिती कृषी सहाय्यक आधिकारी गीता पवार,मयुरी नेवसे यांनी सांगितले.

--

फोटो : ०६

फोटो ओळ : ज्वारीचे दाणे पाखरांची खाल्ले तर काही दाणे काळे पडले आहेत.त्यामूळे काही ठिकाणी ज्वारी जनावरांना टाकावायास सुरवात केली असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

Web Title: Sorghum bread and animal feed will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.