मेट्रो, कचरा समस्यांवर उठविणार आवाज
By admin | Published: December 8, 2014 12:07 AM2014-12-08T00:07:41+5:302014-12-08T00:07:41+5:30
मेट्रो प्रकल्प, अनधिकृत बांधकामे, पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण, रिंग रोड, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली, कचऱ्यासाठी जागेचा प्रश्न, पुणे
पुणे : मेट्रो प्रकल्प, अनधिकृत बांधकामे, पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण, रिंग रोड, झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली, कचऱ्यासाठी जागेचा प्रश्न, पुणे महानगर परिवहन महामंडळ, भामा आसखेड प्रकल्प व पर्वती जलकेंद्राच्या विस्ताराचे प्रलंबित प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेले नाहीत. मात्र, पहिल्यांदाच पुणेकरांनी विधानसभा निवडणुकीत शहरातील सर्व आमदारांना कौल दिला आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षांत शहरात पहिल्यांदाच एक कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री यांच्यासह आठ आमदार भाजपाचे असून, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ते एकत्रित आवाज उठविणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आमदारांकडून प्रलंबित प्रश्नांचा घेतलेला मागोवा...