दक्षिण कमानच्या प्रमुखपदी एस. के. सैनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:43 AM2018-10-02T02:43:45+5:302018-10-02T02:44:17+5:30
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी सोमवारी दक्षिण मुख्यालयाचा पदभार सांभाळला. माजी मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल
पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे माजी कमांडन्ट लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी निवृत्त झाल्यानंतर, लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी सोमवारी दक्षिण मुख्यालयाचा कमांडन्ट पदाचा पदभार स्वीकारला. नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट देत त्यांनी शहिदांना मानवंदना वाहिली. यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी संचलन करीत सैनी यांचे स्वागत केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी सोमवारी दक्षिण मुख्यालयाचा पदभार सांभाळला. माजी मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी (नि.) यांच्या निवृत्तीनंतर सैनी यांची मुख्यालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी सैनी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सैनी यांना जवानांनी मानवंदना दिली. लेफ्टनंट जनरल सैनी यांनी दिल्ली येथील सैन्य मुख्यालयात मनुष्यबळ विभागाच्या संचालकपदाची धुरा सांभाळली आहे. सैनी यांनी त्यांच्या लष्करीसेवेची सुरुवात १९८१ साली केली. या दरम्यान, त्यांनी लष्कराच्या विविध महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. या सोबतच सैनी यांनी विविध लष्करी मोहिमांसाठी कार्य केले आहे.
इराक आणि कुवेत याठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेत डेप्युटी चिफ मिलिटरी पर्सनल आॅफिसर, मंगोलिया येथील जागतिक शांतता परिषद, आॅस्ट्रेलिया येथील दहशतवादविरोधी लष्करी सराव
अशा विविध ठिकाणी त्यांनी काम पाहिले आहे.