बीज प्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:17+5:302021-05-31T04:09:17+5:30
याबाबत अधिक माहिती देताना कोंढाळकर म्हणाले की ...
याबाबत अधिक माहिती देताना कोंढाळकर म्हणाले की वेल्हे तालुक्यात खरीप हंगामात भात, नाचणी, वरई, सोयाबीन, भुईमूग ही पिके घेतली जातात. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२१ मध्ये बीज प्रक्रिया मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. कृषी उत्पादन वाढीमध्ये बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीतून आणि बियाणांद्वारे पसरणाऱ्या रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया हा कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे. त्यादृष्टीने येत्या खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी होण्यासाठी मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. बीजप्रक्रिया मोहीम लोकसहभागातून व विनाअनुदानित तत्त्वावर घेण्यात येत असून भात पिकामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण कमी असून शेतकरी घरचे बियाणे मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढून पीक संरक्षणावर खर्च वाढतो.
बियाणे व कीटकनाशके ,खते हे छापील मूळ किंमती पेक्षा व शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने कोणीही खरेदी करू नयेत. त्याबाबत विक्रेता यांची तक्रार तालुका कृषि अधिकारी कार्यालय वेल्हा किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती वेल्हा यांचेकडे करण्यात यावी .
धनंजय कोंढाळकर तालुका कृषी अधिकारी वेल्हा
वांगणी (ता.वेल्हे)भात बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करताना कृषि सहायक सोमनाथ तांबे व शेतकरी