पावसाच्या दडीमुळे पेरण्या खोळंबल्या
By admin | Published: June 16, 2014 07:59 AM2014-06-16T07:59:10+5:302014-06-16T08:27:46+5:30
मॉन्सूनची अधून -मधून पडणारी थुई-थुई वगळता अपेक्षित पावसाच्या सरी बरसल्या नसल्याने, जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या खरिपाच्या पेरण्या प्रलंबित राहिल्या आहेत
Next
पुणे : मृग नक्षत्र सात जूनपासून सुरू झाले. परंतु यादरम्यान मॉन्सूनची अधून -मधून पडणारी थुई-थुई वगळता अपेक्षित पावसाच्या सरी बरसल्या नसल्याने, जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या खरिपाच्या पेरण्या प्रलंबित राहिल्या आहेत. वेळेत पेरण्या न झाल्यास पिकांची उत्पादकताही घटली जाण्याची भीती अधिक प्रमाणात बळावली जाते. हंगामातील पिकांच्या पेरण्या रखडल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी पावसाळी हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात वळवाचा पाऊस झाला होता. पावसाच्या ओलीमुळे मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासून खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. (प्रतिनिधी)