ओतूर विभागात जोरदार पावसामुळे सोयाबीनचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:54+5:302021-09-23T04:11:54+5:30
-- ओतूर : ओतूर परिसरातील डोमेवाडी, हांडेबन, पानसरे, पट, पानसरेवाडी, डुंबरवाडी, नेतवड, माळवाडी या विभागांत बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या ...
--
ओतूर : ओतूर परिसरातील डोमेवाडी, हांडेबन, पानसरे, पट, पानसरेवाडी, डुंबरवाडी, नेतवड, माळवाडी या विभागांत बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी साठले आणि स़ोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.
ओतूरच्या पुर्व पट्ट्यात व उत्तर विभागात रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, डुंबरवाडी, धोलवड, उदापूर, डिंगोरे आदी ठिकाणी कांदा हे नगदी पीक घेतले जाते. परंतु पूर्व भागात आगाऊ लागवड करतात म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी कांदा रोपे टाकली होती. ती लागवडीसाठी योग्य झाली होती क्षेत्र ही तयार करून ठेवली होती, परंतु अचानक जोरदार पावसामुळे रोपांच्या वापरतात पाणी साठले. त्यामुळे कांदारोपे ७० टक्के सोडून नुकसान झाले आहे.
या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला नाही. बराकीमधील कांदा सडू लागला आहे. त्याला तोड येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे, असे रोहोकडीचे कांदा उत्पादक शेतकरी पोपट घोलप व उदापूरचे राहुल शिवराम शिंदे यांनी सांगितले.
--
फोटो : २२ ओतूर कांदा नुकसान
सोबत फोटो - शेतात सोयाबीन काढले पावसामुळे भिजून नुकसान.