स्पेनच्या शिक्षिकेची साडेसहा लाखांची फसवणूक

By admin | Published: May 21, 2017 03:46 AM2017-05-21T03:46:12+5:302017-05-21T03:46:12+5:30

मूळ स्पेन देशाच्या; परंतु सध्या लोणी काळभोर येथील राजबाग गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या शिक्षिकेस तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने डेबिट

Spanish teacher's fraud of Rs.25 lakhs | स्पेनच्या शिक्षिकेची साडेसहा लाखांची फसवणूक

स्पेनच्या शिक्षिकेची साडेसहा लाखांची फसवणूक

Next

लोणी काळभोर : मूळ स्पेन देशाच्या; परंतु सध्या लोणी काळभोर येथील राजबाग गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या शिक्षिकेस तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने डेबिट कार्ड विश्वासाने काढून घेऊन फसवणूक केली. तब्बल ३ बँक खात्यातून ८ हजार ८५८ युरो म्हणजे ६ लाख ३० हजार रुपये परस्पर काढून घेऊन त्याद्वारे खरेदी करून काही रक्कम आपल्या खात्यात वळवल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ठगास अटक केली आहे.
याप्रकरणी वेनिसा मोहिना हुवरटास (वय ३६, मूळ रा. स्पेन, सध्या रा. राजबाग गुरुकुल, स्टाफ क्वार्टर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखिल ऊर्फ सुरेंद्रसिंग जोगिंदरसिंग पाल (वय २६, रा. कोंढवा) यास अटक केली आहे. हा प्रकार १६ मार्च ते ९ मे या तीन महिन्यांच्या कालावधीत घडला. वेनिसा यांच्या ओळखीचा फायदा घेऊन सिंग याने वेनिसा यांचे डेबिट कार्ड पर्समधून परस्पर काढून घेतले. त्यामधून वरील कालावधीत इव्हो इंटरनॅशनल, एचडीएफसी व बँक आॅफ इंडिया या बँक खात्यातून रक्कम टप्प्याटप्प्याने काढली. इव्हो इंटरनॅशनल बँकेचे डेबिट कार्ड वापरून ६२०० युरो म्हणजे ४ लाख ४१ हजार, बँक आॅफ इंडिया राजबाग, लोणी काळभोर शाखेच्या पगार खात्यातून डेबिट कार्ड व त्याचा पासवर्ड वापरून शॉपिंग करून व एटीएममधून रोख १९५६ युरो म्हणजे १ लाख ४० हजार रुपये काढले. बॅक डीटेल्स चेक केल्यावर प्रकार उघडकीस आला.

Web Title: Spanish teacher's fraud of Rs.25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.