सभापती श्रीधर किंद्रे यांच्या सभापती सभापतिपदाचा राजीनामा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:09+5:302021-02-06T04:18:09+5:30

श्रीधर किंद्रे यांची भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाची एक वर्षाची मुदत संपून एक महिना झाल्याने पक्षश्रेष्ठींना दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या ...

Speaker Shridhar Kindre's resignation approved | सभापती श्रीधर किंद्रे यांच्या सभापती सभापतिपदाचा राजीनामा मंजूर

सभापती श्रीधर किंद्रे यांच्या सभापती सभापतिपदाचा राजीनामा मंजूर

Next

श्रीधर किंद्रे यांची भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाची एक वर्षाची मुदत संपून एक महिना झाल्याने पक्षश्रेष्ठींना दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा देऊन शब्द पाळला आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे लहू शेलार यांना आत्ता सभापतिपदाची संधी मिळणार आहे. सभापतीपद महिलेसाठी राखीव असल्यामुळे मंगल बोडके सभापती झाल्या आणि त्यांनी सव्वा वर्षानी राजीनामा दिला नाही त्यामुळे अडीच वर्षे त्याच सभापतीपदी राहिल्या.

त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण झाल्याने सभापतीपदासाठी श्रीधर किंद्रे आणी लहूनाना शेलार हे प्रबळ दावेदार होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी सभापतीपदाची माळ श्रीधर किंद्रे यांच्या गळ्यात टाकली आणि पहिले वर्ष सभापतीपद श्रीधर किंद्रे यांना तर उपसभापतीपद दमयंती जाधव यांना मिळाले.

दरम्यान, मागील वर्षी सभापतीपदाबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर सर्व पंचायत समिती सदस्य, पक्षाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी श्रीधर किंद्रे यांनी एक वर्षानी म्हणजे ३१ डिसेंबर २०२० ला सभापतीपदाचा लेखी राजीनामा लिहून दिला आहे. त्यानंतर लहूनाना शेलार हे पुढील एक वर्ष सभापती होणार असा निर्णय घेण्यात आला होता. त्याला एक वर्ष एक महिना झाला आहे. मात्र किंद्रे यांनी सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्याकडे दिला आणि तो मंजुरही करण्यात आला.

दरम्यान आज किंद्रे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे राजीनामा दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे उपस्थित होते. हा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार असून त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक लागणार आहे. यामुळे पंचायत समितीचे सदस्य लहुनाना शेलार याचा सभापतिपद मिळणार हे निश्चित झाले आहे.

Web Title: Speaker Shridhar Kindre's resignation approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.