कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहीम; ३ हजार गुन्हेगारांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 07:23 PM2023-02-16T19:23:27+5:302023-02-16T19:42:07+5:30

कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या आरोपींना पोलिसांची नोटीस

Special campaign by police in wake of Kasba by-election; 3 thousand criminals felled | कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहीम; ३ हजार गुन्हेगारांची झाडाझडती

कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहीम; ३ हजार गुन्हेगारांची झाडाझडती

Next

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री पुणेपोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात कारवाई करुन ३ हजार ७०७ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी ५३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

महाशिवरात्र, शिवजयंती तसेच कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविली. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनखाली ही मोहीम राबविण्यात आली. बुधवारी रात्री नऊ ते पहाटे दोन वाजेपर्यंत वेगवेगळ्या भागात स्थानिक पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेतील पथकाने तपासणी मोहीम राबविली. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने टांझानियातातील एकाकडून २३ लाख २६ हजारांचे कोकेन जप्त केले. अमली पदार्थ विराेधी पथकाने मुंढव्यातील एका हुक्का पार्लरवर छापा टाकला.

कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या आरोपींनी पोलिसांनी नोटीस बजावली. ५४४ हाॅटेल, लाॅजची तपासणी करण्यात आली. बसथांबे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करुन १ हजार ४८५ वाहनचालकांची चौकशी करण्यात आली. नियमभंग केल्या प्रकरणी ३२ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर, सहायक आयुक्त सुनील पवार, नारायण शिरगावकर आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Special campaign by police in wake of Kasba by-election; 3 thousand criminals felled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.