लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक : वळसे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:06+5:302021-06-29T04:08:06+5:30

रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी वळसे-पाटील बोलत होते. ...

Special care of children is required: Valse-Patil | लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक : वळसे-पाटील

लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक : वळसे-पाटील

Next

रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी वळसे-पाटील बोलत होते. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील, आमदार अ‍ॅड. अशोक पवार, संग्राम जगताप, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, माजी सरपंच भिमाजीआप्पा खेडकर, माजी सदस्या कविता खेडकर, प.स.सदस्य विक्रम पाचुंदकर, देवदत्त निकम, अ‍ॅड. प्रदीप वळसे-पाटील, अरुण गिरे, सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच धनंजय पवार, प्रा. माणिक खेडकर, उद्योजक राजेश लांडे, श्रीकांत पाचुंदकर, बापूसाहेब शिंदे, नामदेव पाचुंदकर, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे उपस्थित होते. वळसे पाटील पुढे म्हणाले की, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुपरस्प्रेडर ठरणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे व नागरिकांनीही अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असे आवाहन वळसे-पाटील यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात इंद्रायणी मेडिसिटी अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलला जाणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी या वेळी सांगितले. प्रास्तविक प्रा. माणिक खेडकर यांनी केले, स्वागत सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले, तर विक्रम पाचुंदकर यांनी आभार मानले.

फोटो : रांजणगाव गणपती येथे मार्गदर्शन करताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील.

Web Title: Special care of children is required: Valse-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.