विशेष मुलांचा ‘फॅ शन शो’
By admin | Published: November 14, 2014 01:00 AM2014-11-14T01:00:49+5:302014-11-14T01:00:49+5:30
लोकमत बालविकास मंच आणि कुमार पॅसिफिक मॉलतर्फे बालदिनानिमित्त उद्या (दि. 14) विशेष मुलांचा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे.
Next
पुणो : लोकमत बालविकास मंच आणि कुमार पॅसिफिक मॉलतर्फे बालदिनानिमित्त उद्या (दि. 14) विशेष मुलांचा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये सवरेत्तम प्रदर्शन करणा:यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. लिटल एंजल स्कूलच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.
बालदिनानिमित्त मुलांमधील विविध गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बालविकास मंचाकडून विविध उपक्र म राबविण्यात येत असतात. त्यामध्ये मुलांसाठी स्पर्धा, शो, मनोरंजनातून ज्ञान आणि माहिती देणारे उपक्र म यांचे आयोजन करण्यात येते.
याच मालिकेत मोलाची भर घालणारा ‘फॅशन शो’ कुमार पॅसिफिकमध्ये होणार आहे. या शोमधून मुलांना त्यांच्यातील वक्तृत्च, सादरीकरण यांचे कौशल्य सादर करता येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपयांचे पुरस्कार आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
पुणो : लोकमत बालविकास मंच आणि ब्लू बे वॉटर स्पोर्ट्सतर्फे आंबेगाव-जांभूळवाडी तलावाच्या रम्य किना:यावर उद्या बालदिनानिमित्त शालेय विद्याथ्र्याचा आनंद मेळावा रंगणार आहे.
आई-बाबांच्या हाताला धरून ओढत जलनौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी हट्ट करून घेऊन येणारी चिमुकली मुले, तलावातून फेरफटका मारताना दिसणारे सौंदर्य, बगळे, बदक, पाणकोंबडय़ा, पाण्यातून उडय़ा मारणारे मासे यात रमणारी बालके, पानटून, पॅडलिंग, क्याक रोईंग करताना विलक्षण आनंद घेण्यासाठी सारेच उत्सुक असतात. ही संधी उपलब्ध करून देण्यासाठीच ‘ब्लू बे वॉटर स्पोर्ट्स’तर्फे आंबेगाव-जांभूळवाडी तलाव येथे सकाळी 9 ते संध्या 6 र्पयत पुणो परिसरातील 25 शाळांतील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एक आगळावेगळा आनंदमेळा भरविला आहे. क्र ीडापटू ज्योती सावर्डेकर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली असून, त्या या उपक्र माला मार्गदर्शन करणार आहेत.