प्रजासत्ताकदिनानिमित्त घरखरेदीवर विशेष सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:40 AM2018-01-17T05:40:56+5:302018-01-17T05:41:07+5:30
पुण्याचा विकास चारही बाजूंनी होत असताना नगर रस्ता विशेषत: माहिती तंत्रज्ञान व शिक्षण व नोकरी धंद्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे घर खरेदीसाठी उत्सुक
पुणे : पुण्याचा विकास चारही बाजूंनी होत असताना नगर रस्ता विशेषत: माहिती तंत्रज्ञान व शिक्षण व नोकरी धंद्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे घर खरेदीसाठी उत्सुक असणा-या लोकांचा कल या भागांकडे जास्त दिसतो. अभिस्की आणि रितीकृती हे पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिक असून आजवर अनेक गृहप्रकल्प त्यांनी पुणेकरांसाठी आणले आहेत.
अभिस्की आणि रितीकृती (ए.आर.के.) यांच्यातर्फे पुण्यात नगर रस्त्यावर लोणीकंदजवळ नुकताच एक गृहप्रकल्प पुणेकरांसाठी विक्रीस खुला करण्यात आला आहे. सर्बिया इस्टेट या गृहप्रकल्पात १, २, ३ बीएचके घरांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. १९ लाखांपासून ३७ लाखांपर्यंत हे गृहपर्याय आहेत. बांधकाम विकसकामार्फत येणाºया प्रजासत्ताकदिनानिमित्त पहिल्या ५० भाग्यवान ग्राहकांसाठी घरखरेदीमध्ये विशेष घर सवलत योजना आखण्यात आली आहे.
फक्त २६ हजार या नाममात्र शुल्कात आपण आपले घर नक्की करू शकता. ८० टक्के बांधकाम पूर्ण असलेल्या या प्रकल्पात क्लब हाऊस, जिम, जॉगिंग ट्रॅक, अॅम्फी थिएटर, पार्टी लॉन अशा आधुनिक सुखसोयी देण्यात आल्या आहेत. महारेरा मान्यताप्राप्त या गृहप्रकल्पाला सर्व नामांकित बँक व अर्थसंस्थांकडून कर्ज योजना उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक ग्राहकांनी आपले गृहस्वप्न या योजनेत पूर्णत्वास न्यावे, असे आवाहन अभिस्की आणि रितीकृती यांच्या व्यवस्थापनामार्फत विनोद काबरा यांनी केले आहे.
(वा. प्र.)