दिव्यांगांना लसीकरणासाठी विशेष सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:58+5:302021-05-05T04:18:58+5:30
दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवास व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेता राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना ...
दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवास व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेता राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, कोरोनाबाधित असल्यास त्यावरील उपचार तसेच लसीकरण याठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी रघुनाथ येमुल यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
रघुनाथ येमुल यांच्या मागणीला यश मिळाले असून त्यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी पाठविलेल्या पत्राची दखल घेत संबंधित आदेश दिले आहेत. दिव्यांगांना कोरोना चाचणी, तपासणी आणि लसीकरणासाठी प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश तसेच निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे सामाजिक न्याय व विशेष विभागाने पत्राद्वारे आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला कळविले आहे.