पूरग्रस्तांची घरे लुटणाऱ्यांवर राहणार विशेष लक्ष : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:29 AM2019-08-16T11:29:23+5:302019-08-16T11:29:48+5:30

सांगली आणि कोल्हापूर येथे लाखो नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

Special focus will be on those who theft houses of flood victims: Chandrakant Patil | पूरग्रस्तांची घरे लुटणाऱ्यांवर राहणार विशेष लक्ष : चंद्रकांत पाटील 

पूरग्रस्तांची घरे लुटणाऱ्यांवर राहणार विशेष लक्ष : चंद्रकांत पाटील 

Next
ठळक मुद्देविशेथ पोलीस तपास पथक नेमण्याची सूचना

पुणे : पुरामुळे घरदार सोडून नातेवाईक अथवा सरकारी शिबिरांच्या आश्रयाला गेलेल्या नागरिकांच्या घराची चोरट्यांकडून लुट सुरु आहे. अशा घरफोड्या रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात येणार आहे. त्या मार्फत अशा कारवायांना आळा घालण्याची सूचना पोलिसांना केली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
जिल्हा वार्षिक नियोजन योजनांचा आढावा महसूलमंत्री पाटील यांनी घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. हजारो कुटुंबाना घर सोडून सुरक्षित ठिकाणांचा आसरा घ्यावा लागला. चोरट्यांनी ही संधी साधून पूरग्रस्तांच्या घरे लुटण्यास सुरुवात केली आहे. या विषयी बोलताना पाटील म्हणाले, घरफोड्या करणाºया चोरट्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्याची सूचना देण्यात आली आहे. अनेक व्यक्ती पूरग्रस्तांना परस्पर मदत साहित्य पोचवत आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थ आम्हाला मदत हवी म्हणून, ट्रक खाली करुन घेत आहेत. नागरिकांनी देखील प्रशासनाशी समन्वय साधून मदत पाठवावी.
राज्यातील ४ लाख ५३ हजार नागरिकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच राज्यात पाचशेपेक्षा अधिक निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रात ३ लाखापेक्षा जास्त लोक राहत आहेत. कोल्हापूरमध्ये २ कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. पुराचा फटका बसलेल्या गावांचे पुनर्वसन सहा ते आठ महिने चालणार आहे. तर, ६ हजार ८०० कोटी रुपयांमध्ये शेती नव्याने उभी करावी लागणार आहे. प्रत्येक आठवड्याला होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.  
कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती पुढे येत आहेत. पंढरपूर देवस्थान ५ गावे आणि नाना पाटेकर यांची नाम संस्था २ गावे दत्तक घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 
----
सांगली आणि कोल्हापूर येथे लाखो नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या भागातील पूरग्रस्तांना मंगळवारपासून आर्थिक मदत केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीचे पुनर्वसन केले जाईल. वेळप्रसंगी सरकार कर्ज देखील काढेल. तसेच, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

Web Title: Special focus will be on those who theft houses of flood victims: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.