कोंढवळ-निगडाळे ग्रुप ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:59+5:302021-09-05T04:14:59+5:30
तळेघर वार्ताहार:-‘महाआवास अभियान ग्रामीण'' अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोंढवळ-निगडाळे(ता.आंबेगाव) ग्रुप ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान करण्यात ...
तळेघर वार्ताहार:-‘महाआवास अभियान ग्रामीण'' अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोंढवळ-निगडाळे(ता.आंबेगाव) ग्रुप ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान करण्यात आला.
तळेघर : ‘महाआवास अभियान ग्रामीण' अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोंढवळ-निगडाळे (ता. आंबेगाव) ग्रुप ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात महाआवास अभियान पुरस्कार सोहळा वितरण कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले हक्काचे व मजबूत घर असावे असे आदिवासी लोकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न कोंढवळ-निगडाळे ग्रुप ग्रामपंचायतीने पूर्ण केले. तसेच तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पंतप्रधान, शबरी, रमाई या घरकुल (महाआवास) योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी केली, म्हणून राज्य पुरस्कृत योजना उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कोंढवळ-निगडाळे ग्रुप ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशस्तिपत्रक व ट्रॉफीचा पुरस्कार सरपंच दीपक चिमटे, ग्रामसेवक अशोक शेवाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी आंबेगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील भोईर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता लोहकरे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक जोशी, पेसा समिती अध्यक्ष एकनाथ कवटे, वनसमिती सदस्य जितेंद्र गायकवाड, रामदास लोहकरे,प्रशांत पानसरे,मुख्याध्यापक संतोष थोरात उपस्थित होते.
जिल्हा परिषद पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोंढवळ-निगडाळे(ता.आंबेगाव) ग्रुप ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.