स्व: मूल्यांकन, ग्रुप स्टडीला विशेष महत्त्व : मनोज महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:17+5:302021-04-15T04:09:17+5:30

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी असायलाच पाहिजे असे काही नसते. कारण ...

Special importance to self-assessment, group study: Manoj Mahajan | स्व: मूल्यांकन, ग्रुप स्टडीला विशेष महत्त्व : मनोज महाजन

स्व: मूल्यांकन, ग्रुप स्टडीला विशेष महत्त्व : मनोज महाजन

Next

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी असायलाच पाहिजे असे काही नसते. कारण कोणत्याही प्रकारची माहिती, पार्श्वभूमी नसतानाही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळच्या गाळण बु. या खेडेगावातील शिक्षकाचा मुलगा मनोज सत्यवान महाजन यांनी २०१८ साली देशात १२५ वी रँक मिळवली. पहिल्या प्रयत्न अपयशानंतर कठोर मेहनत करत दुसऱ्या प्रयत्नात आरपीएफमध्ये आसिस्टंट कमांडन्ट, तिसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत तर चौथ्या प्रयत्नात थेट जिल्हाधिकारी पद मिळवले आहे. सध्या ते ओडिशा राज्यातील बालनगीर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

स्वतःचे क्षेत्र ओळखणे व त्याबरोबर वैयक्तिक व समाजाच्या परिस्थितीची जाण असणे. माझी ग्रामीण भागाची पार्श्वभूमी खूप उपयोगी पडली. माझे वडील शिक्षक, त्यामुळे अपुऱ्या पगारात त्यांनी प्रचंड कसरत करत आम्हा तीन भावंडाना उच्च शिक्षण दिले. मला या परिस्थितीची जाणीव होती. मात्र, माझ्यापेक्षा लहान भावाला जास्त होती. त्याने स्वतःचे स्वप्न १ वर्षे पुढे ढकलत मला आयएएस बनवण्यासाठी नोकरी केली. त्यामुळे या कठीण परिस्थितीची जाण ठेवत ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम केल्यानेच हे यश मिळाले.

* स्वाध्याय आणि ग्रुप स्टडी

स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास आणि स्वतः केलेला अभ्यास. २०१५ च्या पहिल्या प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास झालो नाही. तेव्हा अपयशाची कारणमीमांसा करताना आपला ग्रुपही आणि ग्रुप स्टडी चुकल्याचे लक्षात आले. यूपीएससीच्या परीक्षेत ग्रुप स्टडीला अनन्य साधारण महत्व आहे. अभ्यासक्रमामधील विविधता आणि व्याप ग्रुप स्टडीच्या माध्यमातून सहज अभ्यासता येतो. मग पुन्हा जोमाने अभ्यास केला. २०१६ ला संपूर्ण देशात ९०३ वी रँक आली. त्यात आरपीएफमध्ये आसिस्टंट कमांडन्ट बनलो. मात्र, आयएएस बनण्याची जिद्द कायम असल्याने पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. ग्रुप स्टडीमध्ये यशस्वी विद्यार्थी काय स्ट्रॅटेजीने अभ्यास करतात, त्याची देवाणघेवाण करत अभ्यास सुरू केला. एकमेकांच्या चुका सांगत, प्रोत्साहनामुळे आमच्या ग्रुपमधील दोन जिल्हाधिकारी, दोन पोलीस आयुक्त, दोन विदेश सेवेत आणि एक जण कस्टम सेवेत निवडले गेले.

* ज्ञानाचा प्रभावी वापर

एकंदरीत यूपीएससी ही परीक्षा दहावा-बारावी किंवा विद्यापीठ परीक्षेसारखी घोका आणि ओका याप्रमाणे नाही. या परीक्षेत मिळवलेल्या ‘ज्ञाना’पेक्षा त्याचा वापर कसा करतात हे महत्त्वाचे आहे. एकंदरीत प्रत्येक विषयाचा व्याप पाहिला तर ज्ञान मिळवण्यासाठी २-२ वर्षे लागणार आहे. म्हणून ज्ञान मिळवण्यास २ गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय वाचायचे आणि दुसरे म्हणजे काय वाचायचे नाही. तर ज्ञान मिळवल्यानंतर ते वापारायचे कसे यासाठी लागते.

* ध्येय ठेवून सराव करणे (टार्गेटेड प्रॅक्टिस)

यूपीएससी परीक्षेत तीन (पायऱ्या) स्टेज असतात. प्रत्येक पायरीला वेगवेगळे कौशल्य लागतात आणि सराव लागतो. जसे पूर्वपरीक्षेसाठी वैकल्पिक प्रश्नांसाठी जास्तीत जास्त पेपर सोडवण्याच्या सराव लागतो. साधरणत: ५ हजार प्रश्न सोडवावे लागतात. त्यानंतर मुख्य परीक्षमध्ये मुक्त लेखक बनण्यापेक्षा मूल्यांकन करणे आणि पेपर सोडवून लेखन कौशल्य सुधारणे, त्यानंतर मुलाखतीसाठी आकर्षक पेहराव, स्पष्ट बोलणे, इंग्रजी सुधारणे, आरशासमोर बसून बोलणे, काही व्याख्याने ऐकणे आदी टार्गेटेड प्रॅक्टिस करावी लागते.

(फोटो : आयएएस मनोज महाजन या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)

Web Title: Special importance to self-assessment, group study: Manoj Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.