Pune Metro: पुणे मेट्रोची खास ऑफर; महिनाभर 'या' कार्डद्वारे अमर्यादित प्रवास करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 03:30 PM2022-03-30T15:30:02+5:302022-03-30T16:12:55+5:30
आजपासून ही सेवा उपल्बध करून देण्यात येणार
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रो उदघाटनानंतर शहरातील मेट्रो सुरु करण्यात आली. मेट्रोला मंजुरी मिळल्यानंतर तब्बल ७ वर्षानंतर पुणेकरांना मेट्रो पाहायला मिळाली आहे. या उत्साहात नागरिकांनी अतिशय आनंदात मेट्रोने प्रवासही केला. त्यामध्येच आता पीएमपीनेही हातभार लावला आहे. पीएमपीने
मेट्रो स्थानकापर्यंत जाता येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने जाहीर केले आहे. आता पुणे मेट्रोने नागरिकांसाठी महिनाभराची खास ऑफर काढली आहे. पुणेकरांसाठी ट्रॅव्हल कार्ड सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. आजपासून ही सेवा उपल्बध करून देण्यात येणार असल्याचे महामेट्रोने सांगितले आहे.
* "पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड सेवेची सुरूवात" *
— Pune Metro Rail (@metrorailpune) March 30, 2022
प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड सेवेची सुरूवात.
पहिल्या 1000 NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनुरूप AFC (ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन) ट्रॅव्हल कार्ड वर विषेश सूट.
कृपया नियम आणि अटी वाचा.#AaliApliMetropic.twitter.com/bQeu06ZHaJ
पुणे मेट्रो ट्रॅव्हल कार्ड पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळ स्टॉप, आणि गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक, येथे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत तिकीट खिडकीवर उपलब्ध होणार आहे. कार्डसाठी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, मतदान कार्ड, शाळेचे ओळखपत्र) यापैकी ओळख पुराव्यांसह फोटो सादर करावे लागणार आहेत. कार्डची किंमत ५०० रुपये असून ते ३० एप्रिलपर्यंत अमर्यादित प्रवासासाठी वापरले जाता येणार आहे. अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.
भुयारी मार्ग वर्षअखेरीस सुरु होणार
शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग पूर्ण भूयारी आहे. मंडईपासून पुढे कसबा पेठेपर्यंतचा एक भाग वगळता येणारा व जाणारा असे दोन्ही बोगदे आता पूर्ण झाले आहेत. बोगदा खोदला जात असतानाच त्याला क्राँक्रिटचे अस्तर तयार होत जाते. या ट्यूबमध्ये आता रूळ टाकण्याचे तसेच वि्द्यूत तारा, दिवे बसवण्याचे काम सुरू आहे. या ५ किलोमीटरच्या भूयारी मार्गात ५ स्थानके आहेत. त्यापैकी शिवाजीनगर स्थानकाचे काम गतीने होत आहे.
स्थानकात दोन्ही बोगदे एकत्र होतात व स्थानकाचे अंतर संपले की पुन्हा स्वतंत्र होतात. सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट या स्थानकांची कामे सुरू आहेत. भूयारी मार्गाचे कामही पूर्ण करून त्यातून वर्षअखेरीस मेट्रो सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.