सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी विशेष प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:00 AM2018-09-21T05:00:35+5:302018-09-21T05:00:39+5:30
तुरुंगातून सुटलेले अथवा सध्या शहरात आलेल्या गुन्हेगारांकडूनच प्रामुख्याने गुन्हे होत असल्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी क्रिमिनल इंटेन्सिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे़
- विवेक भुसे
पुणे : तुरुंगातून सुटलेले अथवा सध्या शहरात आलेल्या गुन्हेगारांकडूनच प्रामुख्याने गुन्हे होत असल्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी क्रिमिनल इंटेन्सिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे़ नागपूरच्या धर्तीवरील या प्रकल्पात ३० पोलीस ठाण्यांमधील रेकॉर्डवरील १२०
गुन्हेगार दररोज चेक करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त डॉ़ के. व्यंकटेशम यांनी अशा प्रकारचा प्रोजेक्ट स्मार्ट सिटी अंतर्गत राबविला आहे़ त्याचा नागपूरमधील गुन्हेगारांवर वचक बसून गुन्हेगारी कमी करण्यात फायदा झाला आहे़ नागपूर पोलीस दलातील अभियंता व कर्मचारी सध्या पुण्यात आले असून, हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचे काम सुरू आहे़ या प्रकल्पांतर्गत एक मध्यवर्ती सेंटर असणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुप करण्यात येईल़ त्यात या पोलीस ठाण्यांतील सर्व सराईत गुन्हेगारांची माहिती असेल़ प्रत्येक झोनचा एक वेगळा ग्रुप असेल व त्यात विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या ग्रुप अॅडमिनचा समावेश असेल़