बेपत्ता मुले-महिलांबाबत राज्यभरात ‘ऑपरेशन मुस्कान - १३’ विशेष शोध मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 01:37 PM2024-11-29T13:37:25+5:302024-11-29T13:38:24+5:30
पुणे : राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ‘ऑपरेशन मुस्कान -१३’ ही विशेष शोधमोहीम १ डिसेंबर ते ३० डिसेंबर ...
पुणे : राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ‘ऑपरेशन मुस्कान -१३’ ही विशेष शोधमोहीम १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत राबविली जाणार आहे. याचदरम्यान पुणे शहरातून हरविलेल्या बेपत्ता बालके (१८ वर्षांखालील व महिलांचा १८ वर्षांवरील) शोध घेण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा येथेे शहरातील सर्व परिमंडळातील पोलिस ठाणेनिहाय टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम पुणे शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना भेट देऊन सदर मोहिमेबाबत पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून संबंधित मोहिमेबाबत माहिती देणार आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे आपल्या पोलिस ठाणे स्तरावर या मोहिमेसाठी एक अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी अशी विशेष टीम तयार करून त्यांच्याकडून ऑपरेशन मुस्कान-१३ द्वारे हरविलेल्या सर्व बालकांचा व १८ वर्षांवरील महिलांचा प्रभावीपणे शोध घेतला जाणार आहे.
ऑपरेशन मुस्कान-१३ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि १८ वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी एक प्रभावी उपक्रम आहे. पुणे शहरात मी सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना याबाबतीत कडक आदेश दिलेले आहेत. यासाठी कोणत्या मोहिमेची वाट न बघता अशा प्रकरणांना २४ तास ३६५ दिवस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त