महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर, कलबुर्गीवरून मुंबईला विशेष गाडी

By अजित घस्ते | Published: November 25, 2023 04:29 PM2023-11-25T16:29:09+5:302023-11-25T16:29:41+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन (दि. ६) डिसेंबरला आहे....

Special train from Solapur, Kalburgi to Mumbai on the occasion of Mahaparinirvana day | महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर, कलबुर्गीवरून मुंबईला विशेष गाडी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर, कलबुर्गीवरून मुंबईला विशेष गाडी

पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोलापूर आणि कलबुर्गी मार्गावर विशेष गाड्या चालवणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन (दि. ६) डिसेंबरला आहे. यासाठी कलबुर्गी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान २, सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान १ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.

कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष गाडी नं. ०१२४५ कलबुर्गी येथून (दि. ५) डिसेंबर रोजी १८.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुस-या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल. तर दुसरी विशेष गाडी नं ०१२४६ ही (दि. ७) रोजी मध्यरात्री ००.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी ११.३० वाजता पोहोचेल.

सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष गाडी नं. ०१२४७ ही (दि. ५) डिसेंबर रोजी २२.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसNया दिवशी ८.२० वाजता पोहोचेल. तर गाडी नं. ०१२४८ ही (दि. ७) रोजी मध्यरात्री ००.२५ वाजता  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ०९.०० वाजता पोहोचेल.

या दोन्ही गाड्यांना कलबुर्गी, गाणगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि मुंबई या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांची नोंद घ्यावी आणि प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Special train from Solapur, Kalburgi to Mumbai on the occasion of Mahaparinirvana day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.