अॅस्पायर एज्युकेशन फेअरचे आज शानदार उद्घाटन
By admin | Published: June 3, 2017 02:33 AM2017-06-03T02:33:53+5:302017-06-03T02:33:53+5:30
चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
विविध नामांकित शिक्षण संस्थांची दालने सज्ज ठेवण्यात आली आहेत. या उपक़्रमात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ करिअर विषयक मार्गदर्शन करणार आहेत.
उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरविण्यासाठी योग्य पर्याय निवडण्याची संधी देणाऱ्या लोकमतच्या या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमास शिक्षण संस्था चालक, करिअर कौन्सिलर, विद्यार्थी, पालक यांचा मोठा सहभाग राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात कालानुरूप अमुलाग्र बदल होत आहेत. त्या बदलाची दखल घेत, भविष्य काळातील आव्हाने ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर कसे घडवावे. दहावी, बारावीनंतर अभ्यासक्रम कोणता निवडावा, कोणत्या व्यावसायिक अभ्यासक़्रमाला महत्व द्यावे, किमान कौशल्यावरील अभ्यासक्रम कोणते? त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील. या विषयीची इंत्यंभूत माहिती अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळणार आहे.
अभ्यासक़्रमाला प्रवेश कसा घ्यायचा, येथपासून ते शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलत योजना, त्या करिता लागणारी कागदपत्रे, शासकीय योजनांतर्गतचे फायदे विद्यार्थ्यांना कसे घेता येतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळणार आहे. करिअर घडविण्याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचे काम या उपकमातून होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी ३ जूनला तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. विविध क्षेत्रातील संधी या विषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.
आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
लोकमत आयोजित अॅस्पायर एज्युकेशन फेअर या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात सकाळी १०.३० वाजता मोठ्या थाटात हा उद्घाटन समारंभ होणार आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग या रस्त्याने शनि मंदिराजवळून सायन्स पार्ककडे जाण्याचा मार्ग आहे.