धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण, कालिचरण महाराजविरुद्ध गुन्हा दाखल
By प्रशांत बिडवे | Updated: August 30, 2023 16:27 IST2023-08-30T16:27:14+5:302023-08-30T16:27:37+5:30
कालिचरण महाराजने केलेल्या भाषणाच्या ध्वनिचित्रफितीतील कायदेशीर बाबी पोलिसांनी पडताळून पाहिल्या

धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण, कालिचरण महाराजविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराज याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी यापूर्वीही कालिचरण महाराजविरुद्ध पुण्यासह राज्यभरात गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिस हवालदार नितीन खुटवड यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कालिचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग (वय ४८, रा. अकाेला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता भागातील सनसिटी रस्ता परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कालिचरण महाराज याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कालिचरण महाराजने धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले. कालिचरण महाराजने केलेल्या भाषणाच्या ध्वनिचित्रफितीतील कायदेशीर बाबी पोलिसांनी पडताळून पाहिल्या. त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कादबाने करत आहेत.