ओतूर परिसरात कोरोनाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:43+5:302021-03-30T04:08:43+5:30

ओतूर परिसरात शुक्रवारी नऊ रुग्ण सापडले. त्यात ओतूर शहरातील ८ व तेजेवाडीतील १ जणाचा समावेश आहे. शनिवारी ओतूर ...

The speed of the corona increased in the Ootor area | ओतूर परिसरात कोरोनाचा वेग वाढला

ओतूर परिसरात कोरोनाचा वेग वाढला

Next

ओतूर परिसरात शुक्रवारी नऊ रुग्ण सापडले. त्यात ओतूर शहरातील ८ व तेजेवाडीतील १ जणाचा समावेश आहे.

शनिवारी ओतूर शहरात ४, डिंगोरे व धोलवड प्रत्येकी एक असे ६ रुग्ण, रविवारी धोलवड १, ओतूर- १, उदापूर- १, असे ३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सोमवारी ओतूर शहरात ९ पॉझिटीव्ह सापडले. केवळ ४ दिवसांत २७ रुग्ण सापडले. विशेषत: पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. परिसरासाठी ही चिंताजनक आहे असे ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले.

या चार दिवसांत परिसरातील बाधितांची संख्या १०३८ झाली आहे. त्यातील ९२८ बरे झाले आहेत. ४२ जणांवर कोविड सेंटर येथे उपचार सुरु आहेत, तर १९ जण घरीच उपचार घेत आहेत. ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ओतूर शहरातील बाधितांची संख्या ५२९ झाली आहे. त्यापैकी ४६५ जण बरे झाले आहेत. २७ जण कोविड सेंटर तर १३ जण घरीच उपचार घेत आहेत. उदापूर येथील बाधितांची संख्या ४१ झाली आहे. ३३ बरे झाले आहेत २ जण कोविड सेंटर तर १ जण घरीच उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील बाधितांची संख्या ३९ झाली आहे. ३० बरे झाले आहेत. ४ जण कोविड सेंटर तर १ घरीच उपचार घेत आहे ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: The speed of the corona increased in the Ootor area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.