शिवाजीनगर येथील बाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:30+5:302021-04-03T04:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महामेट्रो व पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण ...

Speed up the issue of rehabilitation of affected slum dwellers in Shivajinagar | शिवाजीनगर येथील बाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा

शिवाजीनगर येथील बाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महामेट्रो व पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधी नगर येथील मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या तसेच सिद्धार्थनगर येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत शुक्रवारी (दि. २) पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शिवाजीनगर कामगार पुतळा येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसन तत्काळ करणे आवश्यक आहे. तसेच येथील नवीन सदनिकांमध्ये विद्युत मीटर बसवून घेणे, झोपडीधारकांसोबत संबंधित यंत्रणांनी करारनामे करुन घेणे, विमाननगर येथील सदनिकांची किरकोळ कामे पुणे महापालिकेने करुन घेणे, आदी कार्यवाही गतीने करावी.

सिद्धार्थनगर येथील सुमारे ३५० झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत पुणे महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत सद्यस्थितीची माहिती दिली.

Web Title: Speed up the issue of rehabilitation of affected slum dwellers in Shivajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.