महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य; भुजबळ पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 17:10 IST2025-04-10T17:07:41+5:302025-04-10T17:10:11+5:30
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काम आहेत त्यांनी इथल्या लोकांची संपर्क साधून बोलणं, विरोध आहे त्या लोकांची समजूत काढावी

महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य; भुजबळ पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराज
पुणे : महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी असे अजित पवारांनी सांगितले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. यावरून आमदार छगन भुजबळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. महात्मा फुले वाड्याचे स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य आहे. भुजबळ आणि महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यावर नाराज व्यक्त केली. अनेक लोक तयार आहेत जागा द्यायला पण नुसते आता टोलवा टोलवी सुरू आहे, काही नाही झालं तर मला इथं आंदोलन करावं लागेल असा इशारा त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिला आहे.
भुजबळ म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून लोक इथं येतात. शंकर दया शर्मा, शरद पवार यांच्यापासून कार्यक्रम होत आहेत. आम्ही गेले अनेक वर्षांपासून स्मारकासाठी जागा मागत आहोत. महात्मा फुले जयंती कार्यक्रम करत आहे. महात्मा फुलेवाडा वाडा देशाला अर्पण करण्यात आला आहे. तेव्हा पासून आणि त्यापूर्वी पासून अनेक लोक याठिकाणी येतात. याठिकाणी सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. हे १०० ते २०० कोटींचे काम आहे. यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करून देखील प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. मात्र पालिकच्या अधिकाऱ्यांशी लोकांशी संवाद साधून जागा मोकळी करून घेणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी ज्या पद्धतीने जमीन अधिग्रहण केले जाते त्या पद्धतीने या जागेचे अधिग्रहण केले जात नाही. जागा ताब्यात घेण्याचा या ठिकाणचा वेग शून्य आहे. जमीन अधिग्रहणाबाबत पालिका अधिकारी नुसते टोलवा टोळली करत आहे असेही त्यांनी सांगितले. सरकारमध्ये असताना देखील फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलनात का करावं लागतं असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, या गोष्टी सरकारला विचारायला हवं या ठिकाणी जे मंत्री, पालकमंत्री यांना विचारायला हवा की या गोष्टीसाठी आंदोलन का ? करावा लागत आहे.
ते दोन्ही नेते मला आदरस्थानी
माझं भाग्य आहे. 25 ते 27 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यांच्यानंतर शरद पवारांच्या सारखा नेत्या मिळाला. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली दोघेही मोठे नेते आहेत. दोघांपासून मी शिकलो दोघेही मला आदरस्थानी आहेत.